बेरिश पिनेट पॅटर्न : ( Bearish Pennant Pattern )
बेरिश पिनेट
पॅटर्न : ( Bearish Pennant Pattern )
बेरिश पिनेट पॅटर्न हा
एक डाउनट्रेंड मधील सातत्य दाखवणारा ( Trend Continuation ) चार्ट पॅटर्न आहे.
पिनेट पॅटर्न हा अपट्रेन्ड आणि डाउनट्रेंड अशा दोन्ही ट्रेंड मध्ये दिसून येतो.
अपट्रेन्ड मध्ये आल्यास तो अपट्रेन्ड पुढे चालू राहण्याचे संकेत देतो. तर डाउनट्रेंड मध्ये आल्यास तो डाउनट्रेंड पुढे
चालू राहण्याचे संकेत देतो.
या पॅटर्न चे दोन भाग पडतात : पोल ( pole ) आणि
सिमेट्रिकल त्रिकोण ( symmetrical triangle )
पोल : पोल ची लांबी ही
सिमेट्रिकल त्रिकोण च्या लांबीपेक्षा दोन पट किंवा त्यापेक्षा अधिक असावी .
व्हॉल्यूम :
पोल तयार होताना कमी
होणाऱ्या किमतींसोबत व्हॉल्यूम खूप जास्त असते
सिमेट्रिकल त्रिकोण
तयार होताना व्हॉल्यूम कमी कमी होत जाते
बेरिश पिनेट पॅटर्न
पॅटर्न चे टार्गेट : पोल ची उंची जेवढी असेल तेवढ्या आकाराचे खालच्या बाजूला
टार्गेट दिसून येते.
