Saturday, October 4, 2025

INDUSIND बँकेच्या आर्थिक कामगिरीत सतत घसरणीचे संकेत चिंताजनक.

 


इंडसइंड बँकेच्या आर्थिक कामगिरीत सतत घसरणीचे चिंताजनक संकेत दिसत आहेत. 2024 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ कर्जवाटप आणि ठेवींमध्ये तिमाहीआधारित 2% घट नोंदवली गेली आहे. निव्वळ कर्जवाटप ₹3.27 लाख कोटींवर घसरल्याने बँकेच्या वाढीच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ठेवीदेखील कमी होऊन ₹3.89 लाख कोटींवर आल्यानं ग्राहकांमध्ये विश्वास टिकवण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विशेषतः, बँकेच्या चालू व बचत ठेवींच्या गुणोत्तरात (CASA) घट होऊन 31.5% वरून 30.8% वर आल्याने निधी संकलनाच्या गुणवत्तेविषयी शंका वाढल्या आहेत. 

या घटण्यामुळे बँकेला महागड्या कर्जांवर अवलंबून राहावे लागेल, ज्याचा खर्च आणि नफा दोन्हींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.याशिवाय, लेखापरीक्षणातील अडचणींनंतर बँकेने वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. 22 सप्टेंबरपासून प्रभावी होणाऱ्या नवीन CFO  दमानिया यांच्या नावाच्या घोषणेमुळे काहीशे स्थैर्य लाभेल अशी अपेक्षा आहे, पण आर्थिक व व्यवस्थापनाच्या या अनिश्चित काळात, बाजारात गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.राजीव आनंद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही दुसरी वरिष्ठ नियुक्ती असून, बँकेला भविष्यातील आव्हानांचा सामना कसा करायचा याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर इंडसइंड बँकेची पुढील आर्थिक कामगिरी कशी असेल, हे आता काळच ठरवणार आहे. गुंतवणूकदारांनी या परिस्थितीवर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

IndusInd bank चा चालू बाजारभाव : 747.40 रुपये प्रति शेअर 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home