Friday, October 3, 2025

Ceigall india lid. ला रु. 597.00 कोटींचा एलओए प्राप्त

 


Ceigall india ltd. या पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (MSEDCL) तब्बल 597 कोटी रुपयांचा (GST सह) कामाचा आदेश प्राप्त झाला आहे. हा आदेश मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत देण्यात आला असून कंपनीला सौर ऊर्जा उत्पादक (Solar Power Developer – SPD) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या करारान्वये, सीगॉल इंडिया महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये एकूण 147 मेगावॅट (AC) क्षमतेची ग्रीड-कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हे काम 18 महिन्यांत पूर्ण करायचे असून प्रकल्पाचा कार्यकाल 25 वर्षांचा असेल.

सीगॉल इंडिया ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असून तिला उंच रस्ते, उड्डाणपुल, पूल, रेल्वे उड्डाणपुल (ROB), बोगदे, महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि धावपट्ट्या अशा विविध विशेष बांधकाम प्रकल्पांमध्ये दीर्घ अनुभव आहे.

👉 या करारामुळे महाराष्ट्रात हरित उर्जेचा वापर वाढणार असून शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठ्याची उपलब्धता आणखी मजबूत होणार आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home