Saturday, October 4, 2025

Krystal Integrated Services (KISL) या कंपनी ला मिळाली मोठी ऑर्डर.

 


क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड (KISL) ला शिक्षण संचालनालय, नवी दिल्ली यांच्याकडून सुमारे ८३ कोटी रुपयांची  ऑर्डर मिळाली आहे. 

या ऑर्डर अंतर्गत दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या सरकारी शाळा इमारतींमध्ये, क्रीडांगणांमध्ये आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता / हाउसकीपिंग सेवा पुरवण्यासाठी करण्यात आला आहे. या सेवांचा कालावधी दोन वर्षांचा असेल. 

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस ही एक अग्रगण्य एकत्रित सुविधा व्यवस्थापन सेवा देणारी कंपनी आहे, ज्यांचे लक्ष आरोग्यसेवा, शिक्षण, सार्वजनिक प्रशासन, विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो पायाभूत सुविधा तसेच किरकोळ क्षेत्रांवर केंद्रित आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस च्या शेअर चा शुक्रवार चा बाजार भाव:

616.65 रुपये प्रति शेअर


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home