Monday, April 17, 2023

Equity म्हणजे काय ?

 

            या भागामध्ये आपण प्रामुख्याने EQUITY ( शेअर्स ) या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

EQUITY म्हणजेच " हिस्सा  " होय . जेव्हा कंपन्या EQUITY च्या माध्यमातून भांडवल उभारणी

करतात तेव्हा कंपन्या त्यांचा काही हिस्सा विक्रीस काढतात. अशा प्रकारचे व्यवहार हे कॅपिटल मार्केट मध्ये

होतात.

                           ज्या व्यक्ती किंवा संस्था अशा प्रकारचे शेअर्स विकत घेतात ते संबंधित कंपनी मध्ये त्या शेअर्स च्या प्रमाणात मालक बनतात . परिणामी संबंधित कंपनी च्या नफ्या-तोट्यावर शेअरधारकाचे उत्पन्न अवलंबून असते. कंपनीला जेवढा नफा अधिक तेवढाच जास्त फायदा शेअरधारकाला मिळतो. कंपनी तोट्यात गेल्यास शेअरधारकालाही तोटा सहन करावा लागतो.

            जसे नाणे बाजारात गुंतवणूकदाराला उत्पन्न म्हणून व्याज मिळते. तसेच भांडवली बाजारात गुंतवणूकदाराला डिविडेंड शेअरच्या किमतीतील वाढ ( capital appreciation ) अशा दोन  प्रकारे फायदा होतो. 

       भांडवली बाजारावर सेबी ( SEBI ) Security Exchange board of India चे नियंत्रण असते. 

                     भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा नफा किंवा तोटा संबंधित कंपनीच्या नफ्या-तोट्यावर अवलंबून असतो , म्हणून भांडवली बाजारातील गुंतवणूक हि अति जोखमीची मानली जाते . परंतु भांडवली बाजारामध्ये गुंतवणुकीवर मिळणार नफा हा नाणे बाजारातील नफ्यापेक्षा कितीतरी जास्त असू शकतो. आणि म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

                नाणे बाजारामुळे अल्पकालीन कर्जाची गरज पूर्ण होते. मात्र अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी भांडवल संचय ( Capital Accumulation ) होणे महत्वाचे आहे. आणि त्यासाठी विकसित भांडवल बाजाराची ( Capital Market ) ची नितांत आवश्यकता असते. विकसित भांडवली बाजारामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादकता उत्पादन यांच्यात वाढ होते, राष्ट्रीय उत्पन्न वाढते देशाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणून भांडवली बाजाराला अनन्य साधारण महत्व आहे.

               भांडवली बाजारात उद्योजक - व्यावसायिक आपले शेअर्स , डिबेंचर्स , बॉण्ड्स . विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात . यामधून उभा केलेला पैसा हा कायमस्वरूपी उत्पादक भांडवलात गुंतवला जातो . भारत सरकार सुद्धा दीर्घकालीन कर्जरोख्यांद्वारे भांडवली बाजारातून पैसा उभा करते.

 भांडवली बाजाराचे ( Capital Market )  प्रामुख्याने दोन भाग पडतात :

) Primary Market ( प्राथमिक प्रतिभूतींचा बाजार )

) Secondary Market ( दुय्यम प्रतिभूतींचा बाजार )

१)     PRIMARY MARKET ( प्राथमिक प्रतिभूतींचा बाजार ) :

यालाच  नव्या प्रतिभूतींचा बाजार (New Issue Market) किंवा प्राथमिक भांडवल बाजार असे म्हणतात.

Primary Market चे दोन प्रकार पडतात

) IPO ( Initial Public Offering )

) FPO ( Follow on public offering )


) IPO ( Initial Public Offering ) :

             यालाच नवीन प्रतिभूतींचा बाजार असे म्हटले जाते. जेव्हा एखाद्या खाजगी क्षेत्रातील कंपनीला आपल्या व्यवसाय वाढीसाठी मोठ्या आणि दीर्घकालीन भांडवलाची गरज भासते तेव्हा या कंपन्या आपल्या एकून हिस्स्यातील काही हिस्सा ( शेअर्स च्या स्वरूपात  )भांडवली बाजारात विक्रीस काढतात . अशा प्रकारे जेव्हा कंपन्या पहिल्यांदाच आपला हिस्सा भांडवली बाजारात विक्रीस काढतात त्यालाच नव्या प्रतिभूतींचा बाजार असे म्हणतात.

           म्हणजेच IPO च्या माध्यमातून एका खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतरण होण्याची प्रक्रिया सुरु होते. अशा कंपन्यांना IPO च्या माध्यमातून भांडवल उभे करण्यासाठी SEBI च्या नियमांचे पालन करावे लागते. IPO च्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी संधी प्राप्त होतात.

            परंतु IPO हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय असला तरी एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक कारण्याअगोदर त्या कंपनीच्या बाबतीत संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.

 

2) FPO ( Follow on  Public Offering ) :

             जेव्हा शेअर बाजारात अगोदरच नोंदणीकृत कंपनीला आपल्या व्यवसाय वाढीसाठी  नव्याने  मोठ्या आणि दीर्घकालीन भांडवलाची गरज भासते तेव्हा या कंपन्या आपल्या एकून हिस्स्यातील काही हिस्सा पुन्हा  ( शेअर्स च्या स्वरूपात  ) भांडवली बाजारात विक्रीस काढतात . अशा प्रकारे जेव्हा नोंदणीकृत कंपन्या आपला हिस्सा ( Equity ) भांडवली बाजारात विक्रीस काढतात त्यालाच FPO ( Follow on Public Offering ) असे म्हणतात.

SECONDARY MARKET ( विद्यमान रोखे बाजार ) :

       यालाच जुन्या प्रतिभूतींचा बाजार किंवा दुय्यम भांडवल बाजार असे म्हणतात.

एकदा प्रचलित झालेल्या ( IPO च्या माध्यमातून ) शेअर्स ची खरेदी - विक्री , व्यक्ती - व्यक्तींमध्ये , संस्था-संस्थांमध्ये तसेच व्यक्ती- संस्थांमध्ये ज्या ठिकाणी केली जाते त्यालाच विद्यमान रोखे बाजार किंवा दुय्यम भांडवल बाजार असे म्हणतात.

      विद्यमान रोखे बाजार किंवा दुय्यम भांडवल बाजार म्हणजेच शेअर बाजार ( STOCK MARKET ) होय.

 

उपलब्ध माहितीनुसार भारतात रोख्यांमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार १८३६ साली कलकत्याला सुरु झाले. परंतु हे व्यवहार असंघटित ( unorganized )  स्वरूपाचे होते. पुढे फेब्रुवारी १८७७ रोजी मुंबई येथे काही दलालांनी मिळून " नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन " हि संघटना स्थापन केली. हीच संघटना पुढे मुंबई शेअर बाजार म्हणून ओळखली जाऊ लागली. हाच भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वात जुना रोखे बाजार होय.

BOMBAY STOCK EXCHANGE ( BSE ):

स्थापना : फेब्रुवारी १८७७

अधिकृत मान्यता : ३१ ऑगस्ट १९५७

               पुढे १९ ऑगस्ट २००५ रोजी BSE चे रूपांतर सार्वजनिक मर्यादित झाले तेव्हापासून ती BSE LTD. म्हणून ओळखली जाते.

SENSEX हा BSE LTD. या बाजाराचा निर्देशांक ( INDEX ) आहे. त्यामध्ये ३० कंपन्यांच्या समावेश होतो.

NATIONAL STOCK EXCHANGE ( NSE ) - राष्ट्रीय रोखे बाजार

स्थापना : नोव्हेंबर १९९२


NSE चे दोन विभाग पडतात :

) Debt MARKET  :

            यामध्ये डिबेंचर्स ची खरेदी-विक्री केली जाते.

) EQUITY MARKET :

           यामध्ये शेअर्स ची खरेदी-विक्री केली जाते.

NIFTY हा NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE ) चा निर्देशांक ( INDEX ) आहे. त्यामध्ये ५० कंपन्यांचा समावेश होतो.

व्यवहारांच्या संख्येच्या आधारावर NSE भारतातील सर्वात मोठा रोखे बाजार आहे.

 

SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA ( SEBI ) : ( भारतीय रोखे आणि विनियमन संस्था ) 

        भारतीय रोखे आणि विनिमय संस्था हि १९९२ मध्ये गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी स्थापन केली.

सेबी ची कार्ये :  ) विविध नियम तयार करणे

)  कंपन्यांना शेअर्स च्या विक्रीसाठी योग्य वातावरणनिर्मिती करणे.

) रोखे बाजारातील मध्यस्थांची नोंदणी करणे , त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे

) रोखे बाजारातील फसवणुकीच्या तसेच इतर गैरकारभारावर नियंत्रण ठेवणे

       सेबी गुंतवणूकदारांना आर्थिक बाबींच्या क्षेत्रात सुशिक्षित तर करतेच शिवाय त्यांच्या तक्रारी ऐकून निराकरण करते आणि वेळोवेळी गुंतवणूकदारांच्या फायद्याचे नियम बनवते.

                              शेअर बाजारात गुंतवणूक करताना ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे अशा कंपनीबद्दल योग्य माहिती असणे गरजेचे आहे. तसेच कंपनीच्या नफ्या-तोट्याबद्दल , कंपनीच्या उत्पादनाबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

   अशा प्रकारच्या माहितीचे योग्य विश्लेषण करून गुंतवणुकीबद्दल योग्य निर्णय घेतला जातो.

अशा प्रकारे उपलब्ध माहितीचे योग्य विश्लेषण करण्याच्या दोन प्रमुख पद्धतींचा वापर केला जातो .

) FUNDAMENTAL ANALYSIS ( मूलभूत विश्लेषण पद्धत )

) TECHNICAL ANALYSIS ( तांत्रिक विश्लेषण पद्धत )

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home