डोनाल्ड ट्रम्प यांची नवी घोषणा: चीनवर १ नोव्हेंबर २०२५ पासून अतिरिक्त १००% आयात शुल्क (टॅरिफ)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, चीनवर १ नोव्हेंबर २०२५ पासून अतिरिक्त १००% आयात शुल्क (टॅरिफ) लावण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या मते हा निर्णय चीनच्या "अत्यंत आक्रमक व्यापारी भूमिकेला" ( "extraordinarily aggressive position on Trade." ) प्रत्युत्तर म्हणून घेण्यात आला आहे.
चीनच्या निर्यात नियंत्रणाच्या योजनांबद्दल ट्रम्प यांनी म्हटले की, हे "आंतरराष्ट्रीय व्यापारात अभूतपूर्व असून इतर देशांशी संबंध ठेवण्याचा नैतिक अपमान" आहे.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, विद्यमान टॅरिफ व्यतिरिक्त १००% टॅरिफ लागू केले जाईल, तसेच १ नोव्हेंबरपासून "कोणतेही आणि सर्व महत्त्वाचे सॉफ्टवेअर" यावर निर्यात नियंत्रण लावले जाईल.
त्यांनी असेही सूचित केले की, चीनने आणखी काही कृती किंवा बदल केले तर हे अतिरिक्त शुल्क लागू होण्याची तारीख आणखी जवळ आणली जाऊ शकते.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home