Sunday, October 5, 2025

Vedanta Ltd. च्या aluminum उत्पादनात रेकॉर्ड ब्रेक वाढ

 


वेदान्त लिमिटेडने वित्त वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठीच्या उत्पादन आकडेवारीची घोषणा केली.  कंपनीने आपल्या लांजीगढ रिफायनरीत आतापर्यंतच्या सर्वाधिक तिमाही आणि सहामाही ऍल्युमिना उत्पादनाचे रेकॉर्ड नोंदवले असून, हे वार्षिक आधारावर ३१% वाढ दाखवते तर ऐकून उत्पादन ६५३ किलो टन इतके झाले आहे. एकूण ऍल्युमिनियम उत्पादन १% वाढीसह ६१७ किलो टनांपर्यंत पोहचले.

झिंक इंडिया विभागाने मजबूत कामगिरी करून १% वाढीसह २५८ किलो टन माइन केलेले धातू उत्पादन नोंदवले असून, हे आतापर्यंतचे सर्वाधिक दुसऱ्या तिमाही आणि सहामाही उत्पादन आहे. झिंक इंटरनॅशनल विभागाने देखील उल्लेखनीय वाढ नोंदवली असून, माइन केलेले धातू उत्पादन ३८% वाढीसह ६० किलो टन झाले आहे.

 तथापि, आयर्न ओअर उत्पादन १९% घटले, तेल व वायू क्षेत्रातील सरासरी एकूण उत्पादन १५% कमी झाले आणि स्टीलच्या अंतिम उत्पादनात ८% घट झाली. 

 अॅल्युमिनियम व्यवसायातील उल्लेखनीय प्रगती:

कंपनीने लांजीगढ रिफायनरीत आतापर्यंतच्या सर्वाधिक तिमाही आणि सहामाही ऍल्युमिना उत्पादनाचा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून, कार्यक्षमतेच्या जोरावर ऍल्युमिनियम उत्पादनातही ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे.

झिंक इंडिया या विभागाने आतापर्यंतच्या सर्वाधिक दुसऱ्या तिमाही आणि सहामाही उत्पादनाची नोंद केली आहे.

 कॉपर व्यवसाय:

वेदान्त आपला कॉपर व्यवसाय स्टरलाइट कॉपर या उपकंपनीमार्फत चालवते. कंपनीच्या मालमत्तांमध्ये तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे ४,००,००० MTPA क्षमतेचे कॉपर स्मेल्टर संयंत्र आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, वेदान्तचे कॉपर ऑपरेशन्स भारताच्या एकूण कॉपर मागणीपैकी सुमारे ३६% पुरवठा करत होते.सध्याच्या काळातील जागतिक पातळीवरील कॉपरच्या किंमतींतील वाढ वेदान्तच्या कॉपर व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home