Monday, April 17, 2023

भाग-१ कॅण्डल चा योग्य वापर कसा करावा ?

 चला जाणून घेऊया कॅण्डल म्हणजे काय?

टेकनिकल अनालिसिस करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चार्ट चा वापर करतो त्यामध्ये,

१) Line chart ( लाईन चार्ट )

२) Bar Chart ( बार चार्ट )

३) Candlestick Chart  ( कॅन्डलीस्टीक चार्ट )  इत्यादी.  

 मुख्यत्वे आपण कॅन्डलिस्टिक चार्ट चा वापर करत असतो. कारण कॅन्डलिस्टिक चार्ट समजायला अतिशय सोपे असतात. कॅन्डलिस्टिक चार्ट मध्ये दोन प्रकारच्या कॅण्डल पाहायला मिळतात.

१) Green Candle ( हिरवी कॅण्डल ) : यालाच आपण बुलिश कॅण्डल ( Bullish Candle ) असे म्हणतो. म्हणजेच ज्या दिवशी शेअरची किंमत वाढते त्या दिवशीच्या कॅण्डल चा कलर हा हिरवा असतो.

२) Red Candle ( लाल कॅण्डल ) : यालाच आपण बेरिश कॅण्डल ( Bearish Candle ) असे म्हणतो. म्हणजेच ज्या दिवशी शेअरची किंमत कमी होते.  त्या दिवशीच्या कॅण्डल चा कलर हा लाल असतो. 

प्रत्येक कॅण्डल मध्ये आपल्याला चार किमती पाहायला मिळतात ,

१) Open price  :  ओपन प्राईझ म्हणजे त्या दिवशी बाजार कोणत्या किमतीला सुरु झाला. 

२) Close price  : क्लोज प्राईझ म्हणजे त्या दिवशी बाजार कोणत्या किमतीला बंद झाला.

३) High price  : हाय प्राईझ ( उच्च किंमत ) म्हणजे त्या दिवशी बाजारामध्ये आलेली सर्वात जास्त किंमत होय. 

४) Low price  : लो प्राईझ ( निम्न किंमत ) म्हणजे त्या दिवशी बाजारामध्ये आलेली सर्वात कमी किंमत होय. 

खाली चित्रात कॅण्डल ची रचना दाखवली आहे. 





    कॅण्डल दोन भागांची मिळून तयार होते  ,

१) BODY (  वास्तविक शरीर )

२) WICK / SHADOW / TAIL ( शॅडो, विक किंवा टेल् )

                      बॉडीच्या वरच्या बाजूला तयार होणाऱ्या विक ला Upper Wick असे म्हणतात. तर, बॉडी च्या खालच्या बाजूला तयार होणाऱ्या विक ला Lower Wick असे म्हणतात.    



          

जेव्हा आपण चार्ट चा अभ्यास करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला चार्ट वर कॅण्डल पाहायला मिळतात , म्हणून या कॅण्डल विषयी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपण  पाहिले कि कॅण्डल हि दोन भागांची मिळून तयार होते, बॉडी ( Body )आणि विक ( Wick ).

   आता आपण कॅण्डल च्या बॉडी ( Body ) या भागाविषयी अधिक माहिती घेणार आहोत.

कॅण्डल चा बॉडी हा भाग आपल्याला खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) किंवा विक्रीचा दबाव ( selling pressure ) दाखवते. 

 


जर बॉडी चा कलर हा हिरवा ( Green ) असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते कि त्या दिवशी बाजारात खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) होता. यामध्ये हिरव्या बॉडीचा  ( Green Body ) आकार  ( Size ) जर  जास्त असेल तर त्या दिवशी खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) खूप जास्त होता असे दिसून येते. तसेच जर हिरव्या बॉडीचा ( Green Body ) आकार  ( Size ) जर कमी असेल तर त्या दिवशी खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) कमी होता असे दिसून येते.

       जर बॉडी चा कलर हा लाल ( Red  ) असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते कि त्या दिवशी बाजारात विक्रीचा दबाव ( selling pressure )होता. यामध्ये लाल बॉडीचा ( Red Body ) आकार  ( Size ) जर  जास्त असेल तर त्या दिवशी विक्रीचा दबाव ( selling pressure ) खूप जास्त होता असे दिसून येते. तसेच जर लाल बॉडीचा ( Red  Body ) आकार ( Size ) जर कमी असेल तर त्या दिवशी विक्रीचा दबाव ( selling pressure ) कमी होता असे दिसून येते. 

          तात्पर्य असे कि कॅण्डल च्या बॉडी चा आकार ( Size ) हा खूप भाग महत्वाचा आहे.

                 जर अपट्रेन्ड ( UPTREND ) मध्ये ग्रीन कलरच्या बॉडीचा आकार वाढत जात असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते कि खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) वाढत जात आहे म्हणजेच, त्या अपट्रेन्ड मधील ताकद ( Strength ) दिसून येते. यावरून त्या शेअरची किंमत पुढील काळात वाढत जाणार   आहे ( Uptrend Continuation ) असे संकेत मिळतात .

खालील चार्ट पहा .

.



                 जर अपट्रेन्ड ( UPTREND ) मध्ये ग्रीन कलरच्या बॉडीचा आकार कमी होत असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते कि खरेदीचा दबाव ( Buying  Pressure ) कमी होत आहे आणि त्या अपट्रेन्ड मध्ये कमजोरी ( Weakness ) येत आहे. यावरून त्या शेअरची किंमत पुढील काळात कमी होण्याचे ( Uptrend Reversal )  किंवा एकाच ठिकाणी ( Sideways ) काही काळ घालवण्याचे संकेत मिळतात. 

खालील चार्ट पहा .



                   जर डाउनट्रेंड  ( DOWN TREND ) मध्ये लाल कलरच्या बॉडीचा आकार वाढत जात असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते कि विक्रीचा दबाव ( Selling Pressure ) वाढत जात आहे  म्हणजेच, त्या डाउनट्रेंड ( DOWN TREND ) मधील ताकद ( Strength ) दिसून येते . यावरून त्या शेअरची किंमत पुढील काळात कमी-कमी होत जाणार आहे                ( Downtrend Continuation ) असे संकेत मिळतात.

खालील चार्ट पहा .



         जर डाउनट्रेंड  ( DOWN TREND ) मध्ये लाल कलरच्या बॉडीचा आकार कमी होत असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते कि विक्रीचा दबाव ( Selling  Pressure ) कमी होत आहे आणि त्या डाउनट्रेंड मध्ये कमजोरी ( Weakness ) येत आहे. यावरून त्या शेअरची किंमत पुढील काळात वाढणार असल्याचे  ( Downtrend Reversal )  किंवा एकाच ठिकाणी               ( Sideways ) काही काळ घालवण्याचे संकेत मिळतात.

खालील चार्ट पहा .



अशा प्रकारे टेकनिकल अनॅलिसिस करताना कॅण्डल च्या बॉडी या भागाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, पुढील भागात आपण कॅण्डल च्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच वीक किंवा शॅडो बाबत महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत. 


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home