Tuesday, October 7, 2025

Infibeam Avenues लिमिटेड चे भारतातील पहिले ए.आय.-सक्षम पेमेंट प्लॅटफॉर्म 'PayCentral.AI' सुरू. Infibeam Avenues च्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ.

 


इन्फिबीम एव्हेन्यूज लिमिटेडच्या फोनिटिक ए.आय.च्या सहकार्याने भारतातील पहिले ए.आय.-सक्षम पेमेंट प्लॅटफॉर्म 'PayCentral.AI' सुरू करण्यात आले आहे. हे प्लॅटफॉर्म व्यापाऱ्यांसाठी Agent-to-Agent (A2A) डिजिटल पेमेंट व्यवहार शक्य करते, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता एजंट्स कोणतीही मानवी हस्तक्षेप न करता व्यवहार पार पाडतात. 

PayCentral.AI’ चे वैशिष्ट्ये: 

हे प्लॅटफॉर्म गुगलच्या Agent Payment Protocol (AP2) आणि विविध पेमेंट ggregators' Model Context Protocols (MCPs) वर तयार करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे AI एजंट्स merchants साठी पेमेंट लिंक निर्माण करणे, रिफंड प्रक्रिया, सबस्क्रिप्शन व्यवस्थापन आणि अकाउंट रेकन्सिलेशन ही कामे पूर्णतः स्वयंचलित पद्धतीने करू शकतात.

CCAvenue, Stripe, PhonePe यांसारख्या मोठ्या गेटवे प्लॅटफॉर्मसोबत याची seamless इंटरग्रेशन आहे, ज्यामुळे विविध उद्योग—for example, ट्रॅव्हल, OTT, विमा, फायनान्स—येथे ते सहज वापरले जाऊ शकते.

AP2 मुळे cross-platform interoperability साधता येते आणि सर्व व्यवहार सुरक्षित व ऑडिटबल असतात.हे प्लॅटफॉर्म 100% traceable असून, सर्व रेकॉर्ड्स enterprise व नियमपालनासाठी लॉग केले आहेत, तसेच भारतातील डेटाचे भारतीय भौगोलिक सीमांमध्ये जतन सुनिश्चित होते. 

भारतीय डिजिटल व्यापारासाठी महत्त्वडिजिटल इन्शुरन्स, OTT सबस्क्रिप्शन, ट्रॅव्हल बुकिंग यांसारख्या क्षेत्रांत ग्राहक आधीच व्हेरिफायड डिजिटल आयडेंटिटीज (मोबाईल, ईमेल) वापरत असल्यामुळे PayCentral AI हे व्यवहार त्वरित पार पाडण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे व्यवहार यशाचा दर आणि व्यवसाय रूपांतर दर वाढवता येतो.

या तंत्रज्ञानामुळे डिजिटल कॉमर्सचे स्वरुपच बदलण्याची क्षमता आहे. AI एजंट्स म्हणजे शॉपिंग असिस्टंट्स आता फक्त माहिती देण्यापुरतेच नसून थेट पेमेंट रक्कम जमा करत आहे.

CCAvenue सारखे पेमेंट गेटवे आधीच याची इंटिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करत असून, लवकरच हजारो व्यापाऱ्यांना A2A पेमेंट्स ची सुविधा मिळणार आहे.

हे प्लॅटफॉर्म आहे सर्व नियमांची पूर्तता करणारे, स्केलेबल आणि भविष्यातील AI-ड्रिव्हन कामांसाठी तयार आहे, त्यामुळे भारतातील पेमेंट आणि व्यापार क्षेत्रात मोठा गेमचेंजर ठरू शकतो.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home