Fundamental Analysis ( फंडामेंटल ॲनालिसिस ) :
Fundamental Analysis ( फंडामेंटल ॲनालिसिस ) :
फंडामेंटल ॲनालिसिस करणाऱ्या व्यक्तींना Research Analyst असेही म्हटले जाते.
Research : वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून माहिती गोळा करणे.
Analysis : गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेणे.
फंडामेंटल ॲनालिसिस हि कंपनी , उद्योग-व्यवसायाचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. व त्या अभ्यासाच्या आधारावर संबंधीत उद्योगाची किंवा कंपनीची शेअरची योग्य किंमत किती असावी याबद्दल कयास लावला जातो , आणि त्यानंतर गुंतवणुकीबाबत निर्णय घेतला जातो.
फंडामेंटल ॲनालिसिस मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचा, एकूण अर्थव्यवस्थेचा, कंपनी काम करत असलेल्या क्षेत्राचा ( Sector ) , कंपनीचा ( म्हणजेच कंपनीचे उत्पादन, उत्पादकता, नफा-तोटा, कर्ज, इ. चा ) अभ्यास केला जातो. व त्यावरून कंपनीच्या शेअर ची योग्य किंमत किती असावी किंवा एखादा शेअर स्वस्त ( undervalued ) कि महाग ( overvalued ) आहे याबद्दल अभ्यास केला जातो. व त्यानंतर गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो.
कंपनांच्या शेअर च्या किमतींवर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये जागतिक घडामोडी , देशांर्तगत घडामोडी, सरकारची धोरणे , मध्यवर्ती बँकांची धोरणे , अर्थव्यवस्थेतील बचतीचे-खर्चाचे प्रमाण , लोकांच्या मागणीचा कल, मागणी-पुरवठ्यातील प्रमाण, कंपनीचे अंतर्गत निर्णय, कंपनीचा नफा-तोटा ताळेबंद इ. चा समावेश होतो.
फंडामेंटल ॲनालिसिस मध्ये ढोबळ मानाने खालील बाबींचा समावेश होतो :
१) Economic Analysis ( आर्थिक विश्लेषण )
२) Industry Analysis ( उद्योग विश्लेषण )
३) Company Analysis
Economic Analysis ( आर्थिक विश्लेषण पद्धत ) :
याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात :
१) Micro Economic ( सूक्ष्म अर्थशास्र )
२) Macro Economic ( स्थूल अर्थशास्र )
१) Micro Economic ( सूक्ष्म अर्थशास्र ) :
यामध्ये प्रामुख्याने व्यक्तिगत पातळीवर लोकांच्या मानसिकतेचा व निर्णयांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच लोकांची मागणी कोणत्या बाजूला झुकत असते किंवा कोणत्या घटकांची मागणी अधिकाधिक आहे याचा विचार करून तशा प्रकारचे उत्पादन वाढवण्याकडे कंपन्या लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील मागणीच्या आधारावर कंपन्या उत्पादनामध्ये बदल करत असतात व त्याच प्रमाणात वस्तूंच्या किमतींमध्ये बदल होताना दिसून येतो.
म्हणजेच अर्थव्यवस्थेत ज्या वस्तू व सेवांची मागणी अधीक असते त्याच्या उत्पादनावर भर दिला जातो. आणि जेवढी मागणी अधिक तेवढी किंमत अधिक तसेच जेवढा पुरवठा अधिक तेवढी किंमत स्वस्त होताना पाहायला मिळते.
म्हणजेच मागणी व पुरवठ्यावर आधारित अर्थशास्त्राचा अभ्यास करणे म्हणजेच Microeconomic Analysis होय.
२) Macro Economic ( सूक्ष्म अर्थशास्र ) :
यामध्ये एकूणच अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये मागणी-पुरवठा, GDP वाढ-घट, किंमत पातळी निर्देशांक, महागाई, मंदी, बचत दर, खरेदीशक्ती दर, गुंतवणूक दर, जागतिक धोरणे, शासकीय धोरणे, बेरोजगारी इ. चा अभ्यास केला जातो.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचा आणि शासकीय धोरणांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर एकूणच अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांवर पडत असतो. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेतील एकूणच पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असतो. ( व्याज दरातील बदलांमुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचे प्रमाण कमी किंवा जास्त होते. )
तसेच शासकीय धोरणे कोणत्या प्रकारची आहेत , शासन कोणत्या विभागावर किती खर्च करते याचाही मागणी व पुरवठ्यावर परिणाम दिसून येतो. तसेच शासनाच्या आयात-निर्यात धोरणांचा देखील विविध विभागांवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम दिसून येतो .
तसेच मागणी-पुरवठ्यावर देशातील कर व्यवस्थेचा परिणामही खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. परिणामी वरील सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास करणे म्हणजेच MacroEconomic Analysis होय.
Industry Analysis :
Economic analysis मध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. तसेच industry analysis मध्ये अर्थव्यवस्थेतील विविध विभागांचा ( Sector किंवा Industry ) चा अभ्यास केला जातो. Industry म्हणजेच एका सामान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा ग्रुप होय.
उदा. बँकिंग इंडस्ट्री - या मध्ये बँकिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो ( SBI बँक , ICICI बँक, HDFC बँक, kotak बँक इ. )
ऑटो इंडस्ट्री - या मध्ये वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होतो. ( बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा , टाटा मोटर्स , टीव्हीस मोटर्स इ. )
फार्मा इंडस्ट्री - या क्षेत्रामध्ये सनफार्मा , सिप्ला , ऑरोबिन्दो फार्मा इ. चा समावेश होतो ..
अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये फायनान्सियल सेक्टर, हेल्थ सेक्टर,इन्फ्रा सेक्टर , इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि सेक्टर, मेटल सेक्टर, सर्विस सेक्टर, एनर्जी सेक्टर , डिफेन्स सेक्टर, मीडिया सेक्टर इ. विविध प्रकारच्या क्षेत्रांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये अशा विविध क्षेत्रांचा कमी-अधिक प्रमाणात समावेश असतो.
कोणत्या सेक्टर मध्ये तेजीची किंवा मंदीची परिस्थिती आहे, कोणते सेक्टर सध्यपरिथितीत अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहे, येणाऱ्या काळात कोणत्या सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील , देशाची एकूण परिस्थिती पाहता एखाद्या सेक्टरला चालना देण्यासाठी सरकार कोणत्या सेक्टर मध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण करत आहे, जागतिक घडामोडींचा आणि लोकांच्या मागणीचा सर्वात जास्त प्रभाव कोणत्या सेक्टर वर पडत आहे यांचा एकत्रित अभ्यास करणे म्हणजेच Industry Analysis होय.
तसेच अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमध्ये होणारा हंगामी ( seasonal ) चढ-उतारांचा अभ्यास करणे म्हणजे Industry Analysis होय. उदा. कृषी क्षेत्राशी संबंधित विभागांवर कृषी क्षेत्रातील हंगामाचा परिणाम होत असतो, परिणामी वस्तूंच्या किमतींमध्ये सुद्धा चढ-उतार होताना दिसून येतो. आणि त्यामुळे अशा कृषी संबंधित वस्तूंचा आपल्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नावर त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो.
तसेच एखादे नवीन तंत्रज्ञान बाजारात आल्यामुळे त्याचाही काही क्षेत्रांवर अनुकूल तसेच प्रतिकूल परिणाम होताना पाहायला मिळतो. उदा. ऑनलाइन पेमेंट सुविधा या तंत्रज्ञानाचा काही बाबींवर प्रतिकूल तसेच काही बाबींवर अनुकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
company analysis मध्ये कंपनीच्या अंतर्गत बाबींचा जसे कि,कंपनीचे उत्पादन, उत्पादन क्षमता , कंपनीचे व्यवस्थापन, त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांशी तुलना करता संबंधित कंपनीची स्थिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कंपनीच्या ताळेबंदाचा ( Balance Sheet ) अभ्यास करणे होय.
तसेच संबंधीत क्षेत्रात कंपनीची मक्तेदारी किंवा एकाधिकारशाही आहे का? कंपनीचा आयात-निर्यात व्यापार, अचानकपणे उध्दभवणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची कंपनीची क्षमता , कंपनीच्या एकूण कर्जाचे मालमत्तेशी असलेले प्रमाण, कंपनीचा पतदर्जा या आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास company analysis मध्ये केला जातो .
कंपनीच्या Financial Analysis मध्ये कंपनीच्या ताळेबंदाचा ( Balance Sheet ) चा समावेश होतो .कंपनीच्या Balance Sheet मधून आपल्याला कंपनीच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती मिळते. Balance Sheet ला ताळेबंद ( आर्थिक विवरणपत्र ) असे म्हणतात. कंपन्यांना दर ३ महिन्यांनी आपले आर्थिक विवरणपत्र जाहीर करणे आवश्यक आहे.
या आर्थिक विवरणपत्रामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती मिळत असते. त्यामध्ये कंपनीची एकूण मालमत्ता, शेअरधारकांचा हिस्सा, कंपनीवरील कर्जाचे एकूण मालमत्तेशी असलेले प्रमाण, कंपनीला झालेला ऐकून नफा-तोटा , प्रति शेअर नफा-तोटा , कंपनीचे पुस्तकी मूल्य , पुस्तकी मूल्यानुसार प्रति शेअरची किंमत, यासारख्या महत्त्वाच्या बाबींविषयी गुंतवणूकदाराला माहिती मिळते. शक्यतो मालमत्ता नेहमी उत्तरदायित्व ( कर्जे ) आणि शेअरधारकांचा हिस्सा यांच्याशी समान असावी. याचा अर्थ ताळेबंद नेहमी समतोल असावा, ताळेबंदात समतोल नसल्यास, काही समस्या असू शकतात. वरील सर्व माहितीचा अभ्यास करून गुंतवणूकदार
दीर्घकालावधीच्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेत असतात.
आपले भांडवल सुरक्षित ठकाणी गुंतवण्यासाठी ताळेबंदाचा अभ्यास आवश्यक आहे. खाजगी गुंतवणूकदारांचे भांडवल सुरक्षित करण्याचा प्रयत्न करताना कंपनीने खाजगी गुंतवणूकदारांना बॅलन्स शीट प्रदान करणे आवश्यक असते . यावरून गुंतवणूकदाराला कंपनीचे आर्थिक आरोग्य, व्यवसायाची पत आणि कंपनी तिच्या अल्प-मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे की नाही याचे मूल्यांकन करता येते.
पुढील भागात आपण Balance Sheet (ताळेबंद ) मधील काही प्रमुख बाबींविषयी माहिती घेणार आहोत.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home