Tuesday, April 18, 2023

भाग-२ : कॅण्डलच्या विक / शॅडो या भागाचे महत्व

 कॅण्डलच्या विक / शॅडो  या भागाचे महत्व

 या लेखामध्ये आपण कॅण्डल च्या विक / शॅडो  ( wick / shadow  ) या भागाविषयी अधिक माहिती घेणार आहोत.

                कॅण्डल चा विक / शॅडो  ( wick / shadow  ) हा भाग आपल्याला  Rejection ( नकारात्मकता )  किंवा Activation ( सकारात्मकता ) दाखवतो. 

      कॅण्डल मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या विक पाहायला मिळतात.

                १) कॅण्डलच्या वरच्या बाजूला येणारी वीक ( Upper Wick )

               २) कॅण्डलच्या खालच्या बाजूला येणारी वीक ( Lower Wick )

१) कॅण्डलच्या वरच्या बाजूला येणारी वीक ( Upper Wick )

        कॅन्डलच्या वरच्या बाजूला येणारी वीक ( Wick ) आपल्याला त्या दिवशी बाजारात वरच्या किमतींना आलेले Rejection दाखवते. म्हणजेच त्या दिवशी खरेदीदारांनी ( Buyers) शेअर ची किंमत वर घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला होता तो निष्फळ ठरला आहे असे दिसून येते.

       म्हणजेच कॅन्डलच्या वरच्या बाजूला येणारी वीक ( Upper Wick ) मधून आपल्याला असे संकेत मिळतात कि, खरेदीदारांचे ( Buyers ) चे बाजारावरील नियंत्रण कमी-कमी होत आहे. आणि विक्रेत्यांचे ( Sellers ) चे बाजारावरील नियंत्रण वाढत जात आहे.



२) कॅण्डलच्या खालच्या बाजूला येणारी वीक ( Lower Wick )

        कॅन्डलच्या खालच्या बाजूला येणारी वीक (Lower Wick ) आपल्याला त्या दिवशी बाजारात खालच्या किमतींना आलेले Rejection ( नकार ) दाखवते. म्हणजेच त्या दिवशी विक्रेत्यांनी (Sellers ) शेअर ची किंमत खाली घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला होता तो निष्फळ ठरला आहे असे दिसून येते.

       म्हणजेच कॅन्डलच्या खालच्या बाजूला येणारी वीक ( Lower Wick ) मधून आपल्याला असे संकेत मिळतात कि, विक्रेत्यांचे ( Sellers ) चे बाजारावरील नियंत्रण कमी-कमी होत आहे. आणि खरेदीदारांचे ( Buyers ) चे बाजारावरील नियंत्रण वाढत जात आहे.



                        परंतु Upper Wick किंवा Lower Wick ह्या अपट्रेंड च्या किंवा डाउनट्रेंड च्या कोणत्या टप्प्यामध्ये ( Phase ) तयार होतात यावरून त्यांचा अर्थ बदलत असतो. याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया.

          त्याअगोदर बाजारातील विविध टप्पे ( Phase ) विषयी माहिती असणे गरजेचे आहे.

              जेव्हा आपण चार्ट चा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते कि कोणताही शेअर तीन टप्प्यांमध्ये ( Phase ) फिरत असतो किंवा ट्रेड करत असतो.

त्यामध्ये खालील चार टप्प्यांचा ( phases of Market ) समावेश होतो.

१) Accumulation Phase ( संचय टप्पा )

२) Distribution Phase ( वितरण टप्पा )

३) Mark-Up Phase किंवा Participation Phase ( सहभागीदारांचा टप्पा )

4) Mark-Down Phase किंवा Participation Phase (सहभागीदारांचा टप्पा) 

      वरील चारही टप्प्यांविषयी आपले इतर लेख जरूर वाचा. 


ॲक्युम्युलेशन ( Accumulation Zone  )  झोनमधील अप्पर वीक : Upper Wick in Accumulation Phase  


ॲक्युम्युलेशन झोन मध्ये तयार होणारी अप्पर वीक ( Upper Wick ) खरेदीदारांचा सहभाग ( Buyers Activation ) दाखवते म्हणजेच जर ॲक्युम्युलेशन झोनमध्ये कॅन्डलला अप्पर विक तयार होत असेल तर त्यामधून आपल्याला खरेदीदार खरेदी करण्यास उत्सुक आहे असे दिसून येते. म्हणजेच जर ॲक्युम्युलेशन झोनमधील कॅन्डलला वरच्या बाजूला विक तयार होत असेल तर पुढील काळात शेअरच्या किमती वाढण्याचे संकेत मिळतात. आणि म्हणून ॲक्युम्युलेशन झोनमध्ये किंवा सपोर्ट झोन मध्ये तयार होणारे इन्व्हर्टेड हॅमर ( inverted hammer ) , डोजी ( Doji ) , स्पिंनिंग बॉटम ( Spinning Bottom ) पॅटर्न मधून ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात.


ॲक्युम्युलेशन ( Accumulation Zone ) झोनमधील लोअर विक  : Lower Wick in Accumulation Phase

 


ॲक्युम्युलेशन झोन मध्ये तयार होणारी लोअर विक विक्रेत्यांपेक्षा ( Sellers ) खरेदीदारांचे ( Buyers ) प्रमाण अधिक असल्याचे दाखवते. म्हणजेच जर ॲक्युम्युलेशन झोनमध्ये कॅन्डलला लोअर विक तयार होत असेल तर त्यामधून आपल्याला असे दिसून येते की मागणीचा दबाव ( Demand Pressure ) हा विक्रीच्या दबावापेक्षा ( Selling Pressure ) अधिक आहे आणि म्हणून विक्रेत्यांना शेअरच्या किमती खालच्या ( lower side ) किमतींना बंद ( close ) करण्यास शक्य होत नाही . म्हणजेच जर ॲक्युम्युलेशन झोनमधील कॅन्डलला खालच्या बाजूला विक तयार होत असेल तर पुढील काळात शेअरच्या किमती वाढण्याचे संकेत मिळतात. आणि म्हणून ॲक्युम्युलेशन झोनमध्ये किंवा सपोर्ट झोन मध्ये तयार होणारे हॅमर ( Hammer ) , डोजी ( Doji ) , स्पिंनिंग बॉटम ( Spinning Bottom ) पॅटर्न मधून ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात.


 अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमधील लोअर वीक  : ( Lower Wick in Participation phase of an uptrend )


अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये जर कॅन्डलच्या खालच्या बाजूला विक ( Lower Wick ) तयार होत असेल तर त्यामधून आपल्याला अपट्रेन्डमध्ये  खरेदीदारांचे ( Buyers ) वर्चस्व कायम असल्याचे दिसून येते म्हणजेच पुढील काळात देखील शेअरच्या किमती वाढत जाणार आहेत असे दिसून येते. यावरून आपण असे म्हणू शकतो की अपट्रेन्डच्या  पार्टिसिपेशन फेजमध्ये येणारी लोअर विक ( Lower Wick ) तो अपट्रेंड चालू राहण्याचे ( Trend Continuation ) संकेत देते .


 अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेझमधील अप्पर विक: ( Upper Wick in Participation Phase of an Uptrend )

अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये जर कॅन्डलच्या वरच्या बाजूला विक तयार होत असेल तर त्यामधून आपल्याला  खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) कमी होत असल्याचे दिसून येते,  तसेच विक्रीचा दबाव वाढत असल्याचे दिसून येते कारण, अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये खरेदीदारांचे वर्चस्व असते किंवा खरेदीचा दबाव ( Buying Pressure ) अधिक असतो परंतु अपट्रेंडमध्ये कॅन्डलच्या वरच्या बाजूला येणारी अप्पर वीक असे दाखवते की खरेदीदारांना आता शेअरच्या किमती वरच्या बाजूला बंद ( fails to close ) करण्यास शक्य होत नाही म्हणजेच खरेदीच्या दबावापेक्षा ( Buying pressure ) विक्रीचा दबाव ( Selling Pressure ) अधिक होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते यावरून आपण असे म्हणू शकतो की त्या अपट्रेंडमधील खरेदीदारांची ताकद कमी होत आहे किंवा खरेदीदारांची खरेदी करण्याची क्षमता कमी होत आहे परिणामी शेअरच्या किंमतीमध्ये घट होताना दिसून येते.

    अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये कॅन्डलच्या वरच्या बाजूला तयार होणाऱ्या अप्पर वीक मधून आपल्याला पुढील काळात शेअरच्या किमती कमी होण्याचे संकेत मिळतात परंतु जेव्हा आपण चार्ट चा व्यवस्थित अभ्यास करतो तेव्हा असे लक्षात येते की अपट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होणारी अप्पर वीक हे केवळ पुलबॅक ( Sign of  Short term Pullback ) चे संकेत असू शकतात. त्यामधून ट्रेंड रिव्हर्स होईलच असे नाही. 


डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोनमधील अप्पर विक( Upper Wick ) :

डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोनला रजिस्टन्स ( Resistance ) झोन किंवा सप्लाय ( Supply ) झोन असेही म्हणतात. या झोन मध्ये विक्रीचा दबाव ( Selling Pressure )  अधिक असल्याचे पाहायला मिळते म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांनी ॲक्युम्युलेशन ( Accumulation ) झोनमध्ये शेअरची खरेदी केली होती असे गुंतवणूकदार जेव्हा शेअरच्या किमती डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोनमध्ये पोहोचतात तेव्हा आपल्याकडील शेअरची विक्री करण्यास सुरुवात करतात म्हणून डिस्ट्रीब्यूशन झोन मध्ये विक्रीचा दबाव अधिक ( High selling pressure ) असल्याचे दिसून येते.

               डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोन मध्ये तयार  होणाऱ्या अप्पर वीक ( Upper Wick ) मधून विक्रीचा दबाव अधिक असल्याचे दिसून येते कारण खरेदीदारांना आता शेअरच्या किमती वरच्या बाजूला बंद करण्यास शक्य होत नाही म्हणजेच जर डिस्ट्रीब्यूशन झोन मध्ये कॅण्डलला वरच्या बाजूला वीक (Upper Wick ) तयार होत असेल तर त्यामधून आपल्याला खरेदीदार खरेदी करण्यास इच्छुक नाही तसेच विक्रेते मोठ्या प्रमाणात विक्री करत असताना दिसून येते, यावरून मागणीपेक्षा ( Demand)  पुरवठा ( Supply ) अधिक आहे असे संकेत मिळतात परिणामी पुढील काळात शेअरच्या किमती कमी होण्याचे संकेत मिळतात आणि म्हणून डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोनमध्ये म्हणजेच सप्लाय ( Supply ) झोनमध्ये तयार होणाऱ्या अप्पर वीक ( Upper Wick )  मधून ट्रेंड रिवर्स ( Sign of trend Reversal ) होण्याचे संकेत मिळतात त्यामुळे डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोन मध्ये तयार होणारे फॉलींग स्टार ( Falling Star ) , स्पिनिंग टॉप ( Spinning Top ),  डोजी ( Doji ) अशा प्रकारचे पॅटर्न हे ट्रेंड रिव्हर्सल ( Trend Reversal ) पॅटर्न म्हणून ओळखले जातात.


डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोनमधील लोअर विक ( Lower Wick ): 

            डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोनला रजिस्टन्स ( Resistance ) झोन किंवा सप्लाय ( Supply ) झोन असेही म्हणतात. या झोन मध्ये विक्रीचा दबाव ( Selling Pressure ) अधिक असल्याचे पाहायला मिळते. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी ॲक्युम्युलेशन ( Accumulation ) झोनमध्ये शेअरची खरेदी केली होती असे गुंतवणूकदार जेव्हा शेअरच्या किमती डिस्ट्रीब्यूशन ( Distribution ) झोन मध्ये पोहोचतात तेव्हा आपल्याकडील शेअरची विक्री करण्यास सुरुवात करतात म्हणून डिस्ट्रीब्यूशन झोन मध्ये विक्रीचा दबाव     ( Selling Pressure ) अधिक असल्याचे दिसून येते.

          डिस्ट्रीब्यूशन झोन मध्ये तयार होणाऱ्या लोअर वीक ( Lower Wick ) मधून विक्रेते सक्रिय ( Sellers Activation )  झाल्याचे दिसून येतात.  म्हणजेच जर डिस्ट्रीब्यूशन झोनमध्ये कॅण्डलच्या खालच्या बाजूला विक तयार होत असेल तर अशी वीक ( Lower Wick )  आपल्याला विक्रेते सक्रिय होत असल्याचे संकेत देत असते. परिणामी यावरून असे लक्षात येते की डिस्ट्रीब्यूशन झोन ( Distribution Zone ) किंवा सप्लाय झोन ( Supply Zone ) मध्ये विक्रेते सक्रिय होत असल्याने पुढील काळात शेअरच्या किमती कमी होऊ शकतात. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की डिस्ट्रीब्यूशन झोनमध्ये जर कॅण्डलच्या खालच्या बाजूला विक ( Lower Wick ) तयार होत असेल तर यामधून आपल्याला ट्रेंड रिव्हर्स ( sigh of Trend Reversal ) होण्याचे संकेत मिळतात.

             त्यामुळे डिस्ट्रीब्यूशन झोनमध्ये तयार होणारे हँगिंग मॅन ( Hanging Man ), स्पिनिंग टॉप ( Spinning Top ), डोजी ( Doji ) अशा प्रकारचे पॅटर्न हे ट्रेंड रिवर्सल पॅटर्न  ( Trend Reversal Pattern ) म्हणून ओळखले जातात.


डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेज मधील अप्पर विक : ( Upper wick in participation phase of a downtrend ) 

डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये जर कॅन्डलच्या वरच्या बाजूला विक ( Upper Wick )  तयार होत असेल तर, त्यामधून आपल्याला डाऊनट्रेंड मध्ये विक्रेत्यांचे वर्चस्व ( Sellers Aggression) कायम असल्याचे दिसून येते.  म्हणजेच पुढील काळात देखील शेअरच्या किमती कमी होत जाणार आहेत असे संकेत मिळतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेज मध्ये तयार होणारी अप्पर विक तो डाऊन ट्रेंड चालू राहण्याचे (Down Trend continuation ) संकेत देते.


डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेज मधील लोअर विक :  ( Lower Wick in participation phase of a Downtrend ) 


         डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये म्हणजेच मार्क डाऊन फेज मध्ये जर कॅन्डलच्या खालच्या बाजूला विक तयार होत असेल तर, त्यामधून आपल्याला विक्रीचा दबाव  कमी होत असल्याचे दिसून येते.  तसेच खरेदीचा दबाव वाढत असल्याचे दिसून येते कारण,  डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये विक्रेत्यांचे वर्चस्व असते किंवा विक्रीचा दबाव अधिक असतो. परंतु डाऊन ट्रेंडमध्ये कॅन्डलच्या खालच्या बाजूला येणारी लोअर विक असे दाखवते की, विक्रेत्यांना आता शेअरच्या किमती खालच्या बाजूला बंद करण्यास शक्य होत नाही. म्हणजेच विक्रीच्या दबावापेक्षा खरेदीचा दबाव अधिक होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. यावरून आपण असे म्हणू शकतो की, त्या डाऊनट्रेंडमधील विक्रेत्यांची ताकद कमी होत आहे किंवा खरेदीदारांची खरेदी करण्याची क्षमता वाढत आहे. परिणामी शेअरच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येते. डाऊन ट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये कॅन्डल च्या खालच्या बाजूला तयार होणाऱ्या लोअर वीक मधून आपल्याला पुढील काळात शेअरच्या किमती वाढण्याचे  संकेत मिळतात. परंतु जेव्हा आपण चार्ट चा व्यवस्थित अभ्यास करतो तेव्हा असे लक्षात येते की, डाऊनट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होणारी लोअर वीक हे केवळ पुलबॅकचे ( Sign of short term pullback ) संकेत असू शकतात त्यामधून ट्रेंड रिव्हर्स होईलच असे नाही.

          अशा प्रकारे कॅण्डल चा विक / शॅडो हा भाग अतिशय महत्वाचा आहे . कॅण्डलच्या विक / शॅडो  या भागाविषयी योग्य माहिती असल्याशिवाय स्टॉक चे आपण टेक्निकल अनॅलिसिस करणे अशक्य आहे. 





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home