Tuesday, April 18, 2023

स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सर्वोत्तम टाइम फ्रेम कोणती ?

 स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सर्वोत्तम टाइम फ्रेम कोणती ?



स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सर्वोत्तम टाइम फ्रेम कोणती ?" बऱ्याच ट्रेडर्स ना पडणारा हा एक सामान्य प्रश्न आहे, विशेषत: जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत. खरंतर हे सर्व आपल्या स्वतःच्या  ट्रेडिंग स्टाईलवर अवलंबून आहे. म्हणजेच आपण इंट्राडे ट्रेडर आहोत कि शॉर्ट टर्म ट्रेडर ( स्विंग ट्रेडर ) आहोत कि लॉन्ग टर्म ट्रेडर आहोत .  

स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडर्सकडून वेगवेगळ्या टाइम फ्रेम्सचा वापर केला जातो.  त्यामध्ये स्टॉक च्या ट्रेंड ची दिशा ओळखण्यासाठी मोठ्या टाइम फ्रेमचा वापर करावा तर स्टॉक मध्ये एन्ट्री करण्यासाठी छोट्या टाइम फ्रेम चा वापर करावा. 

         सामान्यतः  इंट्राडे ट्रेडर स्टॉकची दिशा ( ट्रेंड ) ओळखण्यासाठी १ तास ते ४ तासांच्या टाइम फ्रेम चा वापर करतात आणि स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी १५ मिनिट ते १ तासांच्या टाइम फ्रेम चा वापर करतात. इंट्राडे ट्रेडिंग करणे नवीन ट्रेडर्स साठी अतिजोखमीचे आहे , म्हणून शक्यतो नवीन ट्रेडर्स नी पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करण्यावर लक्ष केंद्रित करणे केव्हाही फायद्याचे ठरते. 

         शॉर्ट टर्म ट्रेडर ( स्विंग ट्रेडर ) स्टॉकची दिशा ( ट्रेंड ) ओळखण्यासाठी ४ तास ते १  दिवसांच्या टाइम फ्रेम चा वापर करतात आणि स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी १५ मिनिट ते १ तासांच्या टाइम फ्रेम चा वापर करतात.  शॉर्ट टर्म ट्रेडर म्हणून काम करताना शक्यतो वेगवेगळ्या चार्ट पॅटर्न ( हेड आणि शोल्डर , डबल बॉटम , असेन्डिंग त्रिकोण , डिसेंडिंग त्रिकोण , फ्लॅग आणि पोल इ. ) चा अभ्यास फायद्याचा ठरतो. 

         लॉन्ग टर्म ट्रेडर ( पोझिशनल ट्रेडर ) स्टॉकची दिशा ( ट्रेंड ) ओळखण्यासाठी एक आठवड्याच्या टाइम फ्रेम चा वापर करतात आणि स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी १ दिवसाच्या टाइम फ्रेम चा वापर करतात. लॉन्ग टर्म ट्रेडर म्हणून काम करताना चार्ट पॅटर्न , सपोर्ट आणि रेझिस्टन्स , व्हॉल्युम इ चा अभ्यास करणे गरजेचे आहे . 

               वर नमूद केल्याप्रमाणे, तुमच्या ट्रेडिंग स्टाईल नुसार किंवा तुम्ही वापरत असलेल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीच्या आधारावर सर्वोत्तम टाइम फ्रेम चा वापर करत येईल. 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home