FACE VALUE ( दर्शनी किंमत )
FACE VALUE ( दर्शनी किंमत ) :
शेअर ची FACE VALUE म्हणजे दर्शनी किंमत होय. म्हणजेच कंपनीच्या शेअर ची मूळ किंमत होय.
स्टॉक मार्केटमधील व्यक्तीला किंवा गुंतवणूकदाराला स्टॉक मार्केटमधील अनेक संज्ञा माहित असणे आवश्यक आहे. अशी एक संज्ञा म्हणजे दर्शनी मूल्य होय .
सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या कंपन्या IPO (Initial Public Offering ) द्वारे शेअरची विक्री करतात तेव्हा हे दर्शनी मूल्य निश्चित केले जाते.
परंतु , कोणत्याही शेअरचे वास्तविक बाजार मूल्य ( Actual Market Price ) संपूर्णपणे दर्शनी मूल्यावर अवलंबून नसते, कारण शेअरच्या किमतींवर इतर घटक जसे की पुरवठा आणि मागणी यांचा परिणाम होत असतो .
शेअरची मूळ किंमत कंपनीचे संस्थापक किंवा प्रमोटर्स ठरवतात. कंपनीच्या शेअर ची मूळ किंमत हि शेअर सर्टिफिकेट्स मध्ये नमूद केलेली असते.
शक्यतो शेअरची मूळ किंमत कधीही बदलत नाही.
अपवाद : कंपनीने शेअर स्प्लिट केले तर त्या प्रमाणात FACE VALUE बदलत असते.
Face Value= Equity share capital/ number of outstanding shares.
कंपनीचे इक्विटी कॅपिटल काढण्यासाठी FACE VALUE चा वापर केला जातो.
इक्विटी कॅपिटल = कंपनीने देऊ केलेले एकूण शेअर * FACE VALUE
= १,००,००० शेअर * ५
= ५,००,००० रु.
कंपनीच्या वतीने दिला जाणारा लाभांश ( DIVIDEND ) हा FACE VALUE वर दिला जातो.
उदा. कंपनीच्या शेअरची FACE VALUE जर १० रु. असेल आणि जर कंपनीने २०% लाभांश ( DIVIDEND ) देण्याचे ठरवले तर,
तो लाभांश ( DIVIDEND ) म्हणजे FACE VALUE ( १० रु.) च्या २०% म्हणजेच २ रु. प्रति शेअर अशा प्रकारे काढला जातो.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home