बेरिश एन्गलफिंग पॅटर्न ( Bearish Engulfing )
बेरिश एन्गलफिंग पॅटर्न ( Bearish Engulfing ) :
बेरिश एन्गलफिंग
पॅटर्न हा दोन कॅन्डलिस्टीक ने मिळून तयार होणारा बेरिश ट्रेंड रिव्हर्सल ( Bearish Trend Reversal ) पॅटर्न
आहे , जे बाजारामध्ये संभाव्य मंदीचे संकेत
देतात.
बेरिश एन्गलफिंग
पॅटर्न हा अपट्रेंडच्या शीर्षस्थानी म्हणजेच रझिस्टन्स झोन मध्ये तयार होणारा
बेरिश ट्रेंड रिव्हर्सल कॅंडलस्टिक पॅटर्न आहे .
ज्यामध्ये पहिली
कॅण्डल हिरवी (तेजीची) कॅण्डल असते तर दुसरी कॅण्डल लाल (मंदीची) कॅण्डल असते.
ज्यामध्ये लाल (मंदीची) कॅण्डलचा मुख्य भाग म्हणजेच बॉडी आदल्या दिवशीच्या हिरवी
(तेजीची) कॅन्डलच्या मुख्य भागाला म्हणजेच
बॉडीला पूर्णपणे झाकून टाकते म्हणजेच ओव्हरलॅप करते किंवा व्यापते .
यावरून असे दिसून येते कि विक्रेत्यांची बाजारावरील पकड मजबूत होत आहे , परिणामी पुढील काळात शेअरच्या किंमती कमी होण्याचे संकेत मिळतात.
खालील चार्ट पहा :

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home