स्पिनिंग टॉप ( Spinning Top )
स्पिनिंग टॉप ( Spinning Top ) :
स्पिनिंग टॉप हा
रझिस्टन्स झोन मध्ये तयार होणारा बेरिश
ट्रेंड रिवर्सल ( Bearish Trend Reversal ) कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहे. यामध्ये कॅण्डलच्या मध्यभागी छोट्या आकाराची
बॉडी पाहायला मिळते. स्पिनिंग टॉप पॅटर्न मध्ये बॉडी ची साईज ही एकूण कॅण्डलच्या
तुलनेत ५% पर्यंत असल्याचे पाहायला मिळते.
बॉडीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला
जवळपास समान आकाराच्या लांब वीक दिसून
येतात. कॅण्डल मध्ये तयार होणाऱ्या बॉडी चा कलर महत्त्वाचा नसतो म्हणजेच बॉडीचा
कलर हा लाल किंवा हिरवा असू शकतो.
स्पिनिंग टॉप या कॅण्डलिस्टिक पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला तयार होणाऱ्या मोठ्या आकाराच्या वीक मधून बाजारातील अस्थिरता ( High Volatility ) दिसून येते. ज्यावेळी रझिस्टन्स झोनमध्ये अशा प्रकारे अस्थिरता दिसून येते तेव्हा ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात.
Spinning Top Candle = High Volatility
Important :
High volatility at Resistance is the sign of trend reversal , when there is weakness in the background.
उदा. २) खालील चार्ट पहा
जर अपट्रेंडच्या किंवा
डाउनट्रेंडच्या पार्टीसिपेशन झोनमध्ये स्पिंनिंग टॉप / बॉटम पॅटर्न तयार होत असतील
तर त्यामधून आपल्याला ट्रेंड पुढे चालू राहण्याचे संकेत मिळतात.
उदा. १) खालील चार्ट पहा
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home