मजबूत अप्रेंटमधील ताकद दर्शवणारे संकेत : ( Signs of Strong Uptrend )
• मजबूत अप्रेंटमधील ताकद दर्शवणारे संकेत : ( Signs of Strong Uptrend )
एखादा अपट्रेंड किंवा डाउनट्रेंड पुढे चालू राहणार आहे किंवा त्यामध्ये रिव्हर्सल येणार आहे हे ओळखण्यासाठी त्या ट्रेंडमधील ताकद ( Strength ) किंवा कमतरता ( Weakness ) शोधणे गरजेचे असते. त्याप्रमाणे या भागामध्ये आपण ट्रेंड मधील ताकद किंवा कमतरता दाखवणाऱ्या काही प्रमुख संकेतांबाबत माहिती घेणार आहोत. शेअरच्या किमतीमध्ये पुढील काळात वाढ होणार आहे किंवा त्या कमी होणार आहेत हे समजण्यासाठी त्या शेअरच्या ट्रेंड मधील ताकद किंवा कमतरता ओळखता येणे आवश्यक आहे.
मजबूत अप्रेंटमधील ताकद दर्शवणारे संकेत : ( Signs of Strong Uptrend )
१) सिरीज ऑफ हायर हाय आणि हायर लो : ( Series of Higher High and Higher low )
एखादा अपट्रेंड हा मजबूत अपट्रेन्ड आहे असे आपण म्हणतो तेव्हा चार्ट वर हायर
हाय आणि हायर लो ( Higher high and higher low ) अशा प्रकारची रचना पाहायला
मिळते. खालील चार्ट मध्ये आपल्याला हायर
हाय आणि हायर लो अशा प्रकारची रचना दिसून येत आहे.
२) अपट्रेन्डमधील एकूण कॅण्डल पैकी जास्तीत जास्त कॅण्डल या ट्रेंड कॅण्डल
किंवा ट्रेंड बार अशा स्वरूपाच्या असाव्यात.
अपट्रेन्डमध्ये हिरव्या / ग्रीन कलरच्या कॅण्डल या ट्रेंड कॅण्डल ( Trend Bar
) म्हणून ओळखल्या जातात. परंतु सर्वच
ग्रीन कॅण्डल या ट्रेंड कॅण्डल नसतात.
ट्रेंड बार किंवा ट्रेंड कॅण्डल
म्हणजे अशी कॅण्डल ज्यामध्ये एकूण कॅण्डलच्या तुलनेत बॉडी ची साईज ही 50% पेक्षा
अधिक असते. जर अपट्रेन्डमध्ये तयार होणाऱ्या ग्रीन कॅण्डल पैकी बहुतेक कॅण्डल या
ट्रेंड कॅण्डल असतील तर असा ट्रेंड हा मजबूत अपट्रेन्ड आहे असे दिसून येते. व
त्यावरून असे दिसून येते की पुढील काळात देखील शेअरच्या किमती या वाढत जाणार आहेत.
३) अपट्रेन्डमध्ये तयार होणाऱ्या कॅण्डल या शक्यतो एकमेकांमध्ये अडकलेल्या
नसाव्यात म्हणजे त्या एकमेकांपासून लांब असाव्यात.
4) अपट्रेन्डमध्ये
तयार होणाऱ्या ग्रीन कॅण्डलला कोणत्याही बाजूला विक नसावी किंवा असल्यास लहान वीक
असावी.
5) अपट्रेन्डमध्ये येणारे पूलबॅक हे शक्यतो त्या ट्रेंड मधील अगोदरच्या ब्रेक आऊट
पॉईंटला म्हणजेच सपोर्टला स्पर्श करणारे नसावेत.
6) साईड वेज रिवर्सल किंवा पुलबॅक :
अपट्रेंडमध्ये तीन प्रकारचे पुलबॅक पाहायला मिळतात.
१) आइसलँड रिवर्सल
२) मशरूम रिवर्सल
३) साईड वेज रिवर्सल
7) अपट्रेन्ड मध्ये कॅण्डलला शक्यतो विक नसावी किंवा असल्यास कॅन्डलच्या खालच्या बाजूला ( लोअर विक ) वीक असावी.
अपट्रेन्ड मध्ये कॅन्डलच्या खालच्या बाजूला असणारी वीक ( Lower Wick )
खरेदीदारांचे वर्चस्व ( Buyers Aggression ) दाखवते. आणि अपट्रेन्ड मध्ये
खरेदीदारांचे वर्चस्व असणे म्हणजेच तो अपट्रेन्ड मध्ये मजबूत अपट्रेन्ड मध्ये आहे असे दिसून येते.
8) अपट्रेन्ड मध्ये तयार होणाऱ्या ग्रीन कॅण्डल ची साईज ही शक्यतो एकमेकांच्या
तुलनेत सरासरी साईज असावी.
अचानक पणे तयार होणाऱ्या मोठ्या साईजच्या Green कॅण्डल या ट्रेड रिव्हर्स होण्याचे संकेत असतात.
9) अपट्रेन्ड
मध्ये तयार होणाऱ्या दोन कॅन्डलच्या मध्ये जर गॅप असेल तर अशावेळी तो अपट्रेन्ड
मजबूत अपट्रेन्ड असतो. दोन कॅण्डलच्या
मधील गॅप हा खरेदीदारांचा अति उत्साह दाखवतो , परिणामी
शेअरच्या किमती पुढील काळात वाढणार असल्याचे संकेत मिळतात.
१0) अपट्रेन्ड मध्ये तयार होणाऱ्या पुलबॅक झोनमधील लाल कॅण्डल या छोट्या साईजच्या
असतात तसेच रेड कॅण्डलच्या खालच्या बाजूला मोठी विक असते.
11) अपट्रेन्ड मध्ये तयार होणाऱ्या एकूण कॅण्डलच्या संख्येपैकी हिरव्या ग्रीन
कॅण्डलची संख्या ही लाल रेड कॅण्डलच्या संख्येपेक्षा अधिक असते.
वरील चार्ट मध्ये
पाहिले असता आपल्याला असे दिसून येते की Uptrend
१ मध्ये ग्रीन कॅण्डल ची
संख्या ही रेड कॅण्डलच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
परंतु Uptrend २ मध्ये रेड कॅण्डल ची संख्या ही
ग्रीन कॅण्डलच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते आणि त्यानंतर ट्रेंड
मध्ये रिवर्सल आल्याचे चार्टवर दिसून येत आहे.
12) अपट्रेन्ड मध्ये तयार होणाऱ्या हिरव्या ग्रीन कॅण्डल ची साईज ही लाल रेड
कॅण्डलच्या तुलनेत जास्त असते.
13) मजबूत अपट्रेन्ड मध्ये तयार होणाऱ्या ग्रीन कॅण्डलची बंद किंमत ( Close Price ) आणि उच्च किंमत ( high price ) या शक्यतो समान असतात किंवा जवळजवळ असतात. म्हणजेच मजबूत अपट्रेन्ड मध्ये कॅण्डलच्या वरच्या बाजूला वीक नसते.
14) अपट्रेन्डमधील ताकद शोधण्यासाठी आपण वोल्युम या भागाचा सुद्धा अभ्यास करत
असतो. याविषयी पुढील भागात आपण सविस्तर
माहिती घेणार आहोत.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home