Tuesday, April 18, 2023

P/E Ratio : (किंमत-ते-कमाई गुणोत्तर)

 

P/E Ratio : (किंमत-ते-कमाई गुणोत्तर)



 

P/E गुणोत्तर, किंवा किंमत-ते-कमाई गुणोत्तर, हा एक असा निर्देशांक आहे जो स्टॉकची किंमत त्याच्या प्रति शेअर कमाई (EPS) च्या तुलनेत मोजतो . कंपनीच्या शेअर्सचे सापेक्ष ( तुलनात्मक)  मूल्य निर्धारित करण्यासाठी गुंतवणूकदार P/E गुणोत्तर वापरतात. कंपनीच्या शेअरची किंमत जास्त                                ( OVERVALUED ) आहे की कमी ( UNDERVALUED ) आहे हे दाखवण्यासाठी  P/E गुणोत्तराचा वापर केला जातो.  

 

 

                              Market value per share ( बाजारातील शेअर्स ची चालू किंमत )

P/E Ratio=         _______________________________________________

                                   

                                           Earnings per share ( प्रति शेअर कमाई )

 

पी/ गुणोत्तर गुंतवणूकदारांना कंपनीच्या कमाईच्या तुलनेत शेअरचे  बाजार मूल्य निर्धारित करण्यात मदत करते. थोडक्यात, P/E प्रमाण हे दर्शविते की बाजार आज त्याच्या भूतकाळातील किंवा भविष्यातील कमाईच्या आधारावर एका शेअरसाठी किती पैसे देण्यास तयार आहे.

( थोडक्यात P/E Ratio ची जी काही किंमत असेल ती म्हणजे रु. कमावण्यासाठी त्या कंपनीत आपल्याला किती रुपये गुंतवणूक करावी लागेल. )

 

उदा.)  समजा, ABC या कंपनीच्या शेअरची बाजारातील चालू किंमत १०० रु. आहे आणि त्या कंपनीचा EPS हा १० रु. आहे, तर

 

                      १००

P/E Ratio= _______   =  १० रु. होय. 

                       १०  

 

 वरील उदाहरणात P/E Ratio हा १० रु. आहे. म्हणजेच ABC या कंपनीत आपल्याला रु. नफा कमावण्यासाठी १० रु. इतकी गुंतवणूक करावी लागेल. ( म्हणजेच १० पट गुंतवणूक करावी लागेल )

 

उदा.)  समजा, XYZ या कंपनीच्या शेअरची बाजारातील चालू किंमत ७० रु. आहे आणि त्या कंपनीचा EPS हा १० रु. आहे, तर

 

                      ७०

P/E Ratio= _______   =  रु. होय. 

                       १०  

 

 वरील उदाहरणात P/E Ratio हा रु. आहे. म्हणजेच XYZ  या कंपनीत आपल्याला रु. नफा कमावण्यासाठी रु. इतकी गुंतवणूक करावी लागेल. ( म्हणजेच पट गुंतवणूक करावी लागेल )

 

वरील दोन्ही उदाहणांची तुलना करता ABC कंपनीमध्ये रु. कमावण्यासाठी XYZ कंपनीच्या तुलनेत जास्त गुंतवणूक करावी लागते.

यावरून ढोबळ मानाने असे असे लक्षात येते कि ज्या कंपनीचे P/E गुणोत्तर कमी आहे अशी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य समजली जाते.

 

म्हणजेच, उच्च P/E गुणोत्तराचा अर्थ असा होऊ शकतो की एखाद्या कंपनीच्या शेअर ची किंमत  जास्त आहे किंवा गुंतवणूकदार भविष्यात जास्त विकास दराची अपेक्षा करत आहेत.

 

 P/E गुणोत्तराची तुलना एकाच उद्योगातील समान कंपन्यांशी किंवा त्या उद्योगाच्या ( Sector ) च्या एकूण  P/E गुणोत्तराशी केली जाते.

ज्या कंपन्यांचा P/E ratio जास्त आहे त्यांना महाग (OVERVALUED ) स्टॉक असे म्हणतात, तर ज्या कंपन्यांचा P/E ratio कमी आहे त्यांना स्वस्त (UNDER VALUED ) स्टॉक असे म्हणतात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home