Tuesday, April 18, 2023

Mark-Down / Participation Phase:

 

Mark-Down / Participation Phase: 



                 जेव्हा शेअरच्या किमती डिस्ट्रीब्यूशन फेज मधून बाहेर पडतात आणि नवीन ट्रेंड सुरू होताना दिसून येतो त्यावेळी किरकोळ गुंतवणूकदार ( मंदीवाले )  आणि ट्रेडर ( Sellers ) अशा लोकांचा शेअर विक्री करण्यामध्ये सहभाग वाढत जातो यालाच किरकोळ रिटेल गुंतवणूकदारांची ( मंदीवाल्यांची ) फेज किंवा ट्रेडरची फेज असे म्हणतात. किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग आणि ट्रेडर लोकांचा सहभाग यामुळे शेअरच्या किमती हळूहळू कमी होऊ लागतात शेअरच्या किमती कमी होत असताना दिसून येतात अशावेळी इतर छोटे छोटे गुंतवणूकदार ( मंदीवाले ) व ट्रेडर ( Sellers )  सहभाग घेण्यास सुरुवात करतात परिणामी शेअरच्या किमती सतत कमी होत जाताना पाहायला मिळतात. मार्क-डाऊन  फेज  किंवा पार्टीसिपेशन फेज ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये तथाकथित ट्रेंड फॉलोइंग ट्रेडर किंवा मोमेंटम ट्रेडर सहभाग घेत असतात. अशा प्रकारचे ट्रेडर किंवा मोमेंटम ट्रेडर हे अल्प कालावधीसाठी शेअर मध्ये गुंतवणूक करत असतात. अल्पकालावधी मधून मिळणाऱ्या नफ्यानंतर अशा ट्रेडरकडून शेअर मध्ये नफावसुली केली जाते. त्यामुळे काही काळासाठी शेअरच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येते यालाच टेक्निकल अनालिसिस मध्ये पुलबॅक असे म्हणतात अशा प्रकारचे पुलबॅक पार्टिसिपेशन फेजमध्ये ( डाउनट्रेंडच्या )  दिसून येतात.

             पार्टिसिपेशन फेजमध्ये विक्रेत्यांचा उत्साह हा खरेदीदारांपेक्षा अधिक असतो. म्हणजेच मागणीच्या दबावापेक्षा पुरवठ्याचा दबाव अधिक असल्याचे दिसून येते परिणामी शेअरच्या किमती सतत कमी-कमी होत जातात. पार्टीसिपेशन फेज किंवा लोकसहभागाचा टप्पा हा इतर टप्प्यांपेक्षा सर्वात मोठा टप्पा समजला जातो. या टप्प्यामध्ये ट्रेडर लोकांचा उत्साह अधिक असतो. यालाच डाऊनट्रेन्ड असे म्हटले जाते . पार्टिसिपेशन फेज ला विक्रेत्यांचा ( Sellers ) टप्पा असेही म्हटले जाते.

                 या टप्प्यामध्ये तयार होणाऱ्या कॅण्डल पैकी बहुतेक कॅण्डल या लाल ( Red ) कलरच्या असल्याचे पाहायला मिळते तसेच या लाल कॅण्डलची साईज मोठी असल्याचे दिसून येते यावरून असे दिसून येते की विक्रेत्यांचा ( Sellers Aggression ) उत्साह खूप अधिक आहे. 







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home