Accumulation / Support Zone ( संचय टप्पा )
बाजारातील विविध टप्पे
( Phase ) विषयी माहिती असणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण चार्ट चा अभ्यास करतो
तेव्हा आपल्याला असे दिसून येते कि कोणताही शेअर तीन टप्प्यांमध्ये ( Phase ) फिरत असतो किंवा ट्रेड करत असतो.
त्यामध्ये खालील तीन
टप्प्यांचा ( phases of Market ) समावेश
होतो.
१) Accumulation Phase ( संचय टप्पा )
२) Distribution Phase ( वितरण टप्पा )
३) Mark-Up Phase किंवा Participation
Phase ( सहभागीदारांचा टप्पा )
4) Mark-Down
Phase किंवा Participation Phase (सहभागीदारांचा
टप्पा)
Accumulation Phase (ॲक्युम्युलेशन फेज ):
ॲक्युम्युलेशन फेज हा
दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकदारांचा टप्पा म्हणून ओळखला जातो या फेजमध्ये शेअरची
खरेदी ही दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी म्हणून केली जाते.
ॲक्युम्युलेशन फेज म्हणजेच संचय
टप्पा या फेजमध्ये मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार, म्युचल फंड,वित्तीय संस्था, बँका यांच्याकडून शेअरची खूप मोठ्या प्रमाणात पण टप्प्याटप्प्याने खरेदी
केली जाते या फेजमध्ये खरेदी केले जाणारे शेअर हे दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी
म्हणून घेतले जातात या फेजमध्ये शेअरची खरेदी करताना ती टप्प्याटप्प्याने केली जाते
आणि म्हणून आपल्याला चार्ट मध्ये साईड वेज झोन तयार होत असताना पाहायला मिळतात
ॲक्युम्युलेशन फेज म्हणजेच संचय टप्पा हा प्रामुख्याने दीर्घ कालावधीच्या
गुंतवणूकदारांसाठीचा टप्पा म्हणून ओळखला जातो रिटेल ट्रेडर किंवा किरकोळ
गुंतवणूकदारांसाठी हा टप्पा गुंतवणुकीसाठी योग्य समजला जात नाही कारण या फेजमध्ये
शेअर दीर्घकाळासाठी एका साईडवेज ( Sideways ) झोनमध्ये राहू
शकतो.
ॲक्युम्युलेशन फेज हा एक असा टप्पा आहे जो
मंदीच्या परिस्थितीनंतर किंवा मंदीच्या परिस्थितीबरोबर बाजारामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा शेअरच्या किमती या टप्प्यामध्ये येत
असतात तेव्हा त्या स्वस्त झाल्या आहेत किंवा खरेदीयोग्य झाल्या आहेत अशी खात्री
झाल्यानंतर मोठमोठे गुंतवणूकदार त्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात
त्यामुळे त्या शेअरमध्ये पुढील काळात आपल्याला सकारात्मकता तयार होताना दिसून येते
व शेअरच्या किंमतींमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळतात.
ॲक्युम्युलेशन फेजमध्ये
सेलिंग करणाऱ्यांचे म्हणजेच विक्रेत्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत असताना पाहायला
मिळते. तसेच किरकोळ ( Retail ) खरेदीदारांचा उत्साह देखील कमी होताना
कमी होत असतो. याच सर्व गोष्टींचा
मोठमोठ्या गुंतवणूकदारांकडून फायदा घेतला जातो. आणि असे गुंतवणूकदार त्या शेअर
मध्ये खरेदी करण्यास सुरुवात करतात अशी खरेदी करताना ती टप्प्याटप्प्याने केली
जाते म्हणून शेअरच्या किमतीमध्ये अचानक वाढ न होता बराच काळ शेअरच्या किमती या
एकाच किंमत पातळीवर राहिल्याचे दिसून येते. ॲक्युम्युलेशन फेजमध्ये शक्यतो किरकोळ
गुंतवणूकदारांनी किंवा शेअर मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनी सहभाग घेऊ नये कारण, शेअरच्या किमती या टप्प्यामध्ये किती काळ राहतील
याबाबत निश्चित सांगता येत नाही ज्या गुंतवणूकदारांचा नफा कमवण्याचा हेतू हा दीर्घ
कालावधीसाठी असतो अशाच गुंतवणूकदारांनी या टप्प्यामध्ये शेअरच्या किमतीत गुंतवणूक
करणे योग्य ठरते
ॲक्युम्युलेशन फेजमध्ये खरेदी
करणाऱ्यांचे प्रमाण हे विक्रेत्यांपेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे
शेअरच्या किमतींमध्ये घट न होता त्या एकाच किंमत पातळीवर स्थिर राहतात.
ॲक्युम्युलेशन फेजमध्ये शेअरच्या किमती या ठराविक किंमत पातळीमध्ये स्थिर असताना
पाहायला मिळतात अशा वेळी स्विंग ट्रेडिंग केली जाऊ शकते.ॲक्युम्युलेशन फेज
मध्ये ट्रेडिंग करत असताना अतिशय काळजी घेणे
गरजेचे आहे कारण शेअरच्या किमती या ठराविक किंमत पातळीमध्ये ट्रेड करत असतात
त्यामुळे अशा ठिकाणी होणारा नफा हा मर्यादित असतो.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home