Tuesday, April 18, 2023

BOOK VALUE ( पुस्तकी मूल्य ) :

 

BOOK VALUE ( पुस्तकी मूल्य ) :



              BOOK VALUE ( पुस्तकी मूल्य )  म्हणजेच कंपनीची एकूण निव्वळ संपत्ती होय. म्हणजेच , समजा एखादी कंपनी आज विक्रीस काढली ( एकूण मालमत्ता ) त्यातून जी किंमत मिळेल त्यामधून कंपनीवरील सर्व कर्ज वजा केल्यानंतर जी काही रक्कम शिल्लक राहील , ती रक्कम म्हणजेच कंपनीची BOOK VALUE ( पुस्तकी मूल्य ) होय.

म्हणजेच एखाद्या कंपनीचे पुस्तक मूल्य हे त्या कंपनीच्या एकूण मालमत्ता आणि एकूण दायित्वांमधील निव्वळ फरक आहे, जेथे पुस्तक मूल्य कंपनीच्या मालमत्तेचे एकूण मूल्य प्रतिबिंबित करते जे त्या कंपनीच्या भागधारकांना कंपनी लिक्विडेट झाल्यास प्राप्त होईल.

कंपनीचे पुस्तकी  मूल्य अनेकदा कंपनीच्या बाजार मूल्यापेक्षा कमी असते.   

BOOK VALUE ( पुस्तकी मूल्य ) = एकूण संपत्ती - एकूण कर्ज देणेदारी

 

Book Value per Share (BVPS) : प्रति शेअर पुस्तक मूल्य

म्हणजेच ,

                                                             पुस्तकी मूल्य ( BOOK VALUE )

                     _________________________________________________________

                   कंपनीचे बाजारातील ( शेअरधारकांकडील ) एकूण शेअर्स ( Outstanding Shares )

 

उदा. कंपनीचे एकूण पुस्तकी मूल्य हे १०,००,००० रु. आहे आणि कंपनीच्या बाजारातील शेअरची एकूण संख्या ,००,००० इतकी आहे, तर

 

                                                           

प्रति शेअर पुस्तकी मूल्य ( BVPS ) =१०,००,००० / ,००,०००

                                                 = १० रु.

 

कंपनीचे Book Value per Share (BVPS) : प्रति शेअर पुस्तक मूल्य आणि कंपनीच्या शेअरची सध्याची बाजारातील चालू किंमत ( Current Market Price ) यांची तुलना करून कंपनीचे शेअर महाग आहेत कि स्वस्त आहेत हे ठरवता येते.

 

उदा. जर Book Value per Share (BVPS) : प्रति शेअर पुस्तक मूल्यापेक्षा बाजारातील चालू किंमत (  Current Market Price ) हि जास्त असेल तर असे शेअर्स हे महाग ( OVERVALUED ) आहेत असे समजले जाते. ( दीर्घावधीच्या गुंतवणुकीसाठी अयोग्य )

      आणि  जर Book Value per Share (BVPS) : प्रति शेअर पुस्तक मूल्यापेक्षा बाजारातील चालू किंमत (  Current Market Price ) हि कमी असेल तर असे शेअर्स हे स्वस्त  ( UNDERVALUED ) आहेत असे समजले जाते. ( दीर्घावधीच्या गुंतवणुकीसाठी योग्य )

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home