Distribution / Resistance Zone ( वितरण टप्पा )
Distribution
phase ( वितरण टप्पा ) :
डिस्ट्रीब्यूशन फेज ( वितरण टप्पा ) हा दीर्घ कालावधीच्या किंमत
वाढीच्या टप्प्यानंतर ( Uptrend ) तयार होणारा टप्पा
आहे. ॲक्युम्युलेशन फेजमध्ये ज्या
गुंतवणूकदारांनी शेअरची खरेदी केली होती असे गुंतवणूकदार डिस्ट्रीब्यूशन फेजमध्ये
आपल्या शेअरची विक्री करत असतात आणि म्हणून डिस्ट्रीब्यूशन फेज ला पुरवठ्याचा
टप्पा ( Supply Zone ) म्हणूनही ओळखले जाते .डिस्ट्रीब्यूशन फेज हा असा टप्पा आहे ज्यामध्ये मोठ्या
गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री केली जाते शेअरची विक्री करत असताना
गुंतवणूकदारांकडून ती टप्प्याटप्प्याने केली जाते त्यामुळे डिस्ट्रीब्यूशन
फेजमध्ये शेअरच्या किंमती काही काळ ठराविक पातळीवर ( Sideways ) राहतात म्हणजेच
त्या ठिकाणी Sideways Zone तयार होत
असतात. डिस्ट्रीब्यूशन फेज हा मोठ्या
तेजीनंतर ( Long Uptrend ) दिसून येणारा टप्पा आहे. या झोन
मध्ये जेव्हा शेअर च्या किमती असतात तेव्हा शेअर एका विशिष्ट किंमत पातळीवर आला
आहे आणि ती त्या शेअरची योग्य आणि उच्च किंमत आहे असे जेव्हा
गुंतवणूकदारांना वाटू लागते तेव्हा ते आपल्याकडील शेअरची विक्री करण्यास सुरुवात
करतात तसेच नवीन गुंतवणूकदार अशावेळी शेअर च्या
किमती खूप वाढलेल्या असल्यामुळे
गुंतवणूक करण्यास इच्छुक नसतात परिणामी मागणी ( Demand ) कमी होत असते तर पुरवठाचे
( Supply ) प्रमाण वाढत असते आणि म्हणून डिस्ट्रीब्यूशन फेजमध्ये मागणीपेक्षा
पुरवठा अधिक असल्याचे दिसून येते. परिणामी
शेअरच्या किंमती कमी होण्यास सुरुवात होते किंवा तसे संकेत आपल्याला मिळत असतात.
डिस्ट्रीब्यूशन फेजमध्ये अस्थिरता ( Volatility ) अधिक असल्याचे पाहायला मिळते या
फेजमध्ये मागणी ( demand ) आणि पुरवठा ( supply ) यांच्यामध्ये समानता पाहायला मिळते किंवा मागणी ( Demand ) पेक्षा पुरवठा
( Supply ) अधिक असतो.
डिस्ट्रीब्यूशन फेजमध्ये तयार होणाऱ्या
कॅण्डलचा किंवा कॅण्डलिस्टिक पॅटर्नचा , वेगवेगळ्या चार्ट पॅटर्न चा तसेच व्हॅल्यूम चा अभ्यास करून आपण हे ठरवू
शकतो की पुढील काळात शेअरच्या किमती कमी होणार आहेत किंवा वाढणार आहेत कारण ,
प्रत्येक वेळी डिस्ट्रीब्यूशन फेज नंतर शेअरच्या किमती कमी होतातच
असे नाही डिस्ट्रीब्यूशन फेजमध्ये तयार होणाऱ्या कॅण्डल चा आणि कॅण्डलस्टिक पॅटर्न
चा, वेगवेगळ्या चार्ट पॅटर्न चा तसेच व्हॅल्यूम चा अभ्यास
करून योग्य तो निर्णय घेतला जातो. शेअरच्या किमती जेव्हा डिस्ट्रीब्यूशन फेज मध्ये
असतात अशावेळी शक्यतो किरकोळ ( Retail ) गुंतवणूकदारांनी
किंवा शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींनी ( Traders ) गुंतवणूक करणे टाळावे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home