सपोर्ट आणि रजिस्टन्स : ( Support And Resistance )
सपोर्ट आणि रजिस्टन्स : ( Support And Resistance )
टेक्निकल अनालिसिस मध्ये सपोर्ट आणि रजिस्टन्स
या दोन मूलभूत संकल्पना आहेत. सपोर्ट आणि
रजिस्टन्स हे असे झोन आहेत ज्या ठिकाणाहून शेअरच्या किमतींमध्ये मागणी ( Demand )
किंवा पुरवठ्याचे ( Supply ) प्रमाण बदलताना पाहायला मिळते.
शेअरच्या किमतीतील वाढ
ही मागणी आणि पुरवठा यांवर आधारित असते. म्हणजेच मागणी आणि पुरवठा यामुळे शेअरच्या
किमती बदलतात. जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते. तेव्हा शेअरच्या किमती
वाढतात. तसेच जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो तेव्हा शेअरच्या किमती कमी
होतात .काही वेळा मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल पाहायला मिळतो तेव्हा
शेअरच्या किमती या एका स्थिर किंमत पातळीवर ( Sideways ) राहतात.
सपोर्ट ( Support ) म्हणजे काय :
डाऊन ट्रेंडमध्ये मागणी पेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे शेअरच्या किमती
घसरतात. अशा कमी होणाऱ्या किमती जेव्हा
खरेदीदारांना योग्य वाटू लागतात तेव्हा खरेदीदारांकडून योग्य किंमत पातळीवर शेअरची
मागणी वाढत जाते. ज्या स्तरावर वाढणारी
मागणी ही पुरवठ्याशी समान होण्यास सुरुवात होते त्या टप्प्यावर शेअरच्या किमतीतील
घसरण हळूहळू कमी होत जाते आणि अशा ठिकाणी शेअरच्या किमती या एका ठराविक किंमत
पातळीवर स्थिर राहण्यास सुरुवात होते. अशा
ठिकाणी आपल्याला चार्ट मध्ये सपोर्ट झोन ( Support Zone ) तयार होत असताना दिसून
येतो. म्हणजेच ज्यावेळी डाऊन ट्रेंड मध्ये
मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण समान होते तेव्हा सपोर्ट झोन तयार होत असताना दिसून
येतात.
म्हणजेच सपोर्ट झोन हा असा टप्पा
आहे ज्या ठिकाणी शेअरची मागणी इतकी मजबूत असते की ज्यामुळे शेअरच्या किमतीमधील
घसरण थांबते. असे म्हटले जाते की जेव्हा
शेअरच्या किमती या सपोर्ट झोनच्या दिशेने जातात तेव्हा त्या स्वस्त होत असतात
किंवा खरेदीयोग्य होत असतात आणि जेव्हा खरेदीदारांना अशी खात्री वाटते तेव्हा खरेदी करणारे शेअरची मागणी करतात
तसेच विक्री करणारे विकण्यासाठी पुढे येत नाहीत परिणामी पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक
होते आणि यामुळे शेअरच्या किमतीतील घसरण थांबते.
रजिस्टन्स ( Resistance ) म्हणजे काय :
अपट्रेन्ड मध्ये
पुरवठ्यापेक्षा मागणीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेअरच्या किमती सतत वाढत जातात.
अशा वाढत जाणाऱ्या किमती या एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यानंतर ज्या खरेदीदारांनी
शेअर खरेदी केले होते ते खरेदीदार आपल्याकडील शेअरची विक्री करण्यास ( Profit
Booking ) सुरुवात करतात. परिणामी पुरवठ्याचे प्रमाण हे मागणीच्या तुलनेत वाढत
जाते. अशा ठिकाणी आपल्याला चार्ट मध्ये रजिस्टन्स झोन ( Resistance Zone / Supply
Zone ) तयार होत असताना दिसून येतात.
म्हणजेच ज्यावेळी मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण समान होते तेव्हा रजिस्टन्स
झोन तयार होत असतात. रजिस्टन्स झोन हा असा टप्पा आहे ज्या ठिकाणी शेअरचा पुरवठा
इतका मजबूत असतो की ज्यामुळे शेअरच्या किमतीमधील वाढ थांबते. असे म्हटले जाते की जेव्हा शेअरच्या किमती या
रजिस्टन्स झोनमध्ये किंवा रजिस्टन्स झोनच्या दिशेने जातात तेव्हा त्या महाग होत
असतात. किंवा खरेदी करण्यासाठी योग्य नसतात. परिणामी खरेदीदारांची खरेदी करण्याची
इच्छा कमी होते तसेच विक्रेत्यांचे विक्री
करण्याचे प्रमाण वाढत जाते यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक होतो आणि शेअरच्या
किमतीतील वाढ थांबते. अशा ठिकाणी आपल्याला चार्ट मध्ये रजिस्टन्स झोन तयार होत
असताना दिसून येतात.
सपोर्ट आणि रजिस्टन्स
शोधण्यासाठी टेक्निकल अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो
त्यामध्ये,
१) Trend line ( ट्रेंड लाईन )
२) Trend Channel ( ट्रेंड चॅनल )
३) Moving Averages ( मुविंग ऍव्हरेजेस )
४) Previous Breakout And Breakdown Point (अगोदरचे ब्रेक आउट आणि ब्रेक
डाऊन पॉईंट )
५) Previous Swing High and Swing Low Point (अगोदरचे स्विंग हाय आणि स्विंग
लो पॉईंट )
६) Pivot Point ( पिव्होट पॉईंट )
७) Fibonacci
Ratios ( फिबोनाची रेशो )
१)
Trend line ( ट्रेंड लाईन ):
ट्रेंड लाईन चा वापर
सपोर्ट आणि रजिस्टन्स म्हणून केला जातो. ट्रेंड लाईन ही शेअरच्या किंमतीची प्रचलित
दिशा ( Direction of price behaviour ) दाखवण्यासाठी काढलेली रेष आहे. ट्रेंड लाईन
चा वापर करून किमतीची दिशा आणि गती (
momentum ) यांच्याबाबत माहिती मिळते.
शेअर जेव्हा अपट्रेन्ड मध्ये असतो तेव्हा ट्रेंड लाईन चा वापर सपोर्ट
म्हणून केला जातो. तसेच शेअर जेव्हा डाऊन
ट्रेंड मध्ये असतो तेव्हा ट्रेंड लाईन चा वापर रजिस्टन्स म्हणून केला जातो. अपट्रेन्ड मध्ये चार्ट वर तयार होणारे लो पॉईंट
( lower price point ) तसेच डाउनट्रेंड मध्ये चार्ट वर तयार होणारे हाय पॉईंट (
higher price point ) एकमेकांना जोडून एक सरळ रेषा काढता येते तिलाच ट्रेंड लाईन
असे म्हणतात. ट्रेंड लाईन काढण्यासाठी किमान तीन निम्न ( Low ) किंवा उच्च ( high ) किंमत बिंदू ( price point
) एकत्र जोडणे आवश्यक आहे.
अपट्रेन्ड मध्ये शेअरची किंमत
जेव्हा सपोर्ट लाईनला स्पर्श करते अशावेळी खरेदीदारांकडून शेअर मध्ये खरेदी
करण्यासाठी संधी शोधली जाते. त्यासाठी
जेव्हा शेअरची किंमत सपोर्ट लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये येणारा
विकनेस ( Weakness ) शोधला
जातो व त्यानंतर शेअरमध्ये खरेदी करण्यासाठी संधी शोधली जाते.
डाउनट्रेंड मध्ये शेअरची किंमत जेव्हा
रझिस्टन्स लाईनला स्पर्श करते अशावेळी विक्रेत्यांकडून शेअर मध्ये विक्री
करण्यासाठी संधी शोधली जाते. त्यासाठी
जेव्हा शेअरची किंमत रझिस्टन्स लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये
येणारा विकनेस ( Weakness ) शोधला जातो व त्यानंतर शेअरमध्ये विक्री
करण्यासाठी संधी शोधली जाते.
खालील चार्ट मध्ये अपट्रेन्ड मधील सपोर्ट लाईन दिसून येत आहे
2)
Trend Channel ( ट्रेंड चॅनल ):
ट्रेंड चॅनेल चे तीन प्रकार पडतात
१) Rising Trend Channel
२) Falling Trend Channel
३) Sideways Trend Channel
Rising Trend Channel :
•
अपट्रेन्ड
मध्ये शेअरची किंमत जेव्हा सपोर्ट लाईनला स्पर्श करते अशावेळी खरेदीदारांकडून शेअर
मध्ये खरेदी करण्यासाठी संधी शोधली जाते.
त्यासाठी जेव्हा शेअरची किंमत सपोर्ट लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या
किमतीमध्ये येणारा विकनेस ( Weakness ) शोधला जातो व त्यानंतर शेअरमध्ये खरेदी करण्यासाठी संधी शोधली जाते.
• डाउनट्रेंड मध्ये शेअरची किंमत जेव्हा रझिस्टन्स लाईनला स्पर्श करते अशावेळी विक्रेत्यांकडून शेअर मध्ये विक्री करण्यासाठी संधी शोधली जाते. त्यासाठी जेव्हा शेअरची किंमत रझिस्टन्स लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये येणारा विकनेस ( Weakness ) शोधला जातो व त्यानंतर शेअरमध्ये विक्री करण्यासाठी संधी शोधली जाते.
अपट्रेन्ड मध्ये
शेअरची किंमत जेव्हा सपोर्ट लाईनला स्पर्श करते अशावेळी खरेदीदारांकडून शेअर मध्ये
खरेदी करण्यासाठी संधी शोधली जाते.
त्यासाठी जेव्हा शेअरची किंमत सपोर्ट लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या
किमतीमध्ये येणारा विकनेस ( Weakness ) शोधला जातो व त्यानंतर शेअरमध्ये खरेदी करण्यासाठी संधी शोधली जाते.
डाउनट्रेंड मध्ये शेअरची किंमत जेव्हा रझिस्टन्स लाईनला स्पर्श करते अशावेळी विक्रेत्यांकडून शेअर मध्ये विक्री करण्यासाठी संधी शोधली जाते. त्यासाठी जेव्हा शेअरची किंमत रझिस्टन्स लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये येणारा विकनेस ( Weakness ) शोधला जातो व त्यानंतर शेअरमध्ये विक्री करण्यासाठी संधी शोधली जाते.
Sideways Trend
Channel :
अपट्रेन्ड मध्ये शेअरची किंमत
जेव्हा सपोर्ट लाईनला स्पर्श करते अशावेळी खरेदीदारांकडून शेअर मध्ये खरेदी
करण्यासाठी संधी शोधली जाते. त्यासाठी
जेव्हा शेअरची किंमत सपोर्ट लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये येणारा
विकनेस ( Weakness ) शोधला
जातो व त्यानंतर शेअरमध्ये खरेदी करण्यासाठी संधी शोधली जाते.
डाउनट्रेंड मध्ये शेअरची किंमत जेव्हा रझिस्टन्स लाईनला स्पर्श करते अशावेळी विक्रेत्यांकडून शेअर मध्ये विक्री करण्यासाठी संधी शोधली जाते. त्यासाठी जेव्हा शेअरची किंमत रझिस्टन्स लाईन जवळ पोहोचते तेव्हा शेअरच्या किमतीमध्ये येणारा विकनेस ( Weakness ) शोधला जातो व त्यानंतर शेअरमध्ये विक्री करण्यासाठी संधी शोधली जाते.
३) Moving Averages ( मुविंग ऍव्हरेजेस )
मूव्हिंग एव्हरेज हा टेक्निकल एनालिसिस मध्ये ट्रेडर लोकांकडून तसेच मोठ्या गुंतवणूकदारांकडून वापरला जाणारा अतिशय महत्त्वाचा निर्देशक ( Indicator ) आहे. त्याच्या साधेपणामुळे आणि कार्यक्षमतेमुळे याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. मूव्हिंग एव्हरेज या इंडिकेटर चे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात त्यामध्ये सिम्पल मूव्हिंग एव्हरेज ( SMA ), एक्सपोनेन्शल मूव्हिंग एव्हरेज ( EMA ), वेटेड मूव्हिंग एव्हरेज ( WMA ) इ. प्रकारच्या मूव्हिंग एव्हरेज चा समावेश होतो.
मूव्हिंग एव्हरेज या इंडिकेटर चा वापर सपोर्ट आणि रजिस्टन्स
म्हणूनही केला जातो. त्यामध्ये मोठ्या
प्रमाणात सिम्पल मूव्हिंग एव्हरेज ( SMA ) आणि एक्सपोनेन्शल मूव्हिंग एव्हरेज ( EMA ) यांचा वापर केला
जातो.
मूव्हिंग एव्हरेज चा वापर करत असताना
वेगवेगळ्या कालावधीचा ( Time Period ) वापर केला जातो त्यामध्ये, ९-दिवस, २०-दिवस , ५०-दिवस,
१००-दिवस आणि 200-दिवस या मूलभूत कालावधीच्या मूव्हिंग एव्हरेज चा
वापर केला जातो.
• खालील चार्ट मध्ये 50-दिवसांचे सिम्पल मूव्हिंग एव्हरेज ( 50 Day SMA ) सपोर्ट म्हणून काम करताना दिसून येत आहे.
•
खालील
चार्ट मध्ये 200-दिवसांचे सिम्पल मूव्हिंग एव्हरेज ( 200 Day SMA ) सपोर्ट म्हणून
काम करताना दिसून येत आहे.
•
खालील
चार्ट मध्ये 50-दिवसांचे एक्सपोनेन्शल
मूव्हिंग एव्हरेज ( 50 Day EMA ) सपोर्ट आणि रजिस्टन्स म्हणून काम करताना
दिसून येत आहे.
• अशाप्रकारे वेगवेगळ्या कालावधीच्या मूव्हिंग एव्हरेज चा वापर सपोर्ट आणि रजिस्टन्स शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.
४) Previous Breakout And Breakdown Point (अगोदरचे ब्रेक आउट आणि ब्रेक डाऊन
पॉईंट )
•
खालील चार्ट मध्ये
अगोदरचा ब्रेक आऊट पॉईंट सपोर्ट म्हणून काम करताना दिसून येत आहे
4)
Previous Swing High and Swing Low Point
(अगोदरचे स्विंग हाय आणि स्विंग लो पॉईंट )
•
अशाप्रकारे
पिव्होट पॉईंट इंडिकेटर आणि जीवनाची फीबोनाची रेशो यांचा वापर सपोर्ट आणि
रजिस्टन्स शोधण्यासाठी केला जातो याविषयी पुढील भागामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार
आहोत.
•
सपोर्ट
आणि रजिस्टन्स झोन हे ट्रेडर्स लोकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी अतिशय महत्त्वाचे
झोन म्हणून ओळखले जातात. जेव्हा शेअरच्या
किमती या सपोर्ट आणि रजिस्टन्स झोनमध्ये पोहोचतात त्यावेळी त्या शेअरमध्ये
गुंतवणूक करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणजेच सपोर्ट आणि रजिस्टन्स हे अतिशय
महत्त्वाचे झोन असतात . जेव्हा शेअरच्या किमती सपोर्ट किंवा रजिस्टन्स झोनमध्ये
पोहोचतात तेव्हा त्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ किंवा उतार होताना दिसून
येतात . शेअरच्या किमती या रजिस्टन्स झोन मध्ये किंवा सपोर्ट झोन मध्ये पोहोचत
असताना त्यामध्ये विकनेस ( Weakness ) किंवा
स्ट्रेन्थ ( Strength ) निर्माण होत असते.
शेअरच्या किंमतीमध्ये निर्माण होणाऱ्या विकनेस ( Weakness ) किंवा स्ट्रेन्थ ( Strength ) यांचा अभ्यास करून
गुंतवणुकीबाबत किंवा ट्रेडिंग बाबत योग्य निर्णय घेतला जातो. त्यामुळे शेअरच्या किंमतींमध्ये निर्माण होणारा
विकनेस ( Weakness ) किंवा स्ट्रेन्थ ( Strength ) ओळखता येणे गरजेचे आहे. या भागामध्ये शेअरच्या किंमतीमध्ये निर्माण
होणारी स्ट्रेन्थ किंवा विकनेस कशाप्रकारे ओळखायचे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
•
अशा
प्रकारची विकनेस ( Weakness ) किंवा स्ट्रेन्थ ( Strength ) ओळखण्यासाठी कॅन्डल चा
अभ्यास करणे आवश्यक आहे . कॅन्डल मधील दोन भाग म्हणजेच बॉडी ( Body ) आणि विक (
Wick ) यांचा अभ्यास करून ट्रेंड मधील स्ट्रेन्थ किंवा विकनेस ओळखता येतो.
•
एखादा
अपट्रेंड किंवा डाउनट्रेंड पुढे चालू राहणार आहे किंवा त्यामध्ये रिव्हर्सल येणार
आहे हे ओळखण्यासाठी त्या ट्रेंडमधील ताकद ( Strength ) किंवा कमतरता ( Weakness )
शोधणे गरजेचे असते. त्याप्रमाणे या
भागामध्ये आपण ट्रेंड मधील ताकद किंवा कमतरता दाखवणाऱ्या काही प्रमुख संकेतांबाबत
माहिती घेणार आहोत. शेअरच्या किमतीमध्ये
पुढील काळात वाढ होणार आहे किंवा त्या कमी होणार आहेत हे समजण्यासाठी त्या
शेअरच्या ट्रेंड मधील ताकद किंवा कमतरता ओळखता येणे आवश्यक आहे
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home