Dividend : (लाभांश )
Dividend : (लाभांश )
लाभांश किंवा डिव्हिडंड म्हणजे कंपनीच्या नफ्यातुन आपल्या भागधारक म्हणजेच शेअरधारकाला दिला जाणारा मोबदला.
कर आणि इतर खर्च वजा केल्यानंतर जो नेट प्रॉफिट (निव्वळ नफा) राहतो त्यातून काही भाग हा कंपनीच्या भागधारकांमध्ये समान प्रमाणात वितरीत केला जातो. म्हणजेच ज्या कंपन्या अधिक नफा कमावतात अशा कंपन्या आपल्या शेअरधारकांना डिव्हिडंड देत असतात. म्हणून डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या दीर्घकालावधीच्या गुंतवणुकीसाठी योग्य समजल्या जातात.
परंतु, डिव्हिडंड द्यावा की नाही हे पूर्णपणे कंपनीच्या संचालक मंडळावर अवलंबून असते.ज्यावेळेस कंपनीला नफा होतो त्यावेळेस कंपनी ठरवते की आपल्या निव्वळ नफ्यातुन शेअर धारकांना डिव्हिडंड द्यायचा की नाही.काही वेळा कंपनी डिव्हिडंड देण्याऐवजी तोच नफा कंपनीत गुंतवून कंपनीच्या व्यवसाय वाढवण्यासाठी वापरतात.
नवीन असणाऱ्या कंपन्यांकडून शक्यतो आपला नफा भागधारकांमध्ये वाटण्यापेक्षा तोच पैसा कंपनीच्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो.
डिव्हिडंड हा नेहमी शेअरच्या Face Value ( दर्शनी किंमत ) वर दिला जातो आणि त्याची गणना देखील Face Value वर केली जाते.
उदा. समजा ABC या कंपनीने ३०% लाभांश देण्याचे ठरवले आणि या कंपनीची FACE VALUE ( दर्शनी किंमत ) १० रुपये असेल तर आपल्याला प्रति शेअर ३ रुपये इतका डिव्हिडंड ( लाभांश ) मिळेल
जर आपल्याकडे ABC या कंपनीचे ५०० शेअर्स असतील, व या कंपनीने आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर ३ रुपये लाभांश जाहिर केला तर,
५०० शेअर * ३ रु प्रति शेअर डिव्हिडंड =१५०० रु . इतका लाभांश मिळेल.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home