Wednesday, April 19, 2023

हँगिंग मॅन ( Hanging Man )

 हँगिंग मॅन  ( Hanging Man ) :

हँगिंग मॅन हा सिंगल कॅण्डलिस्टिक पॅटर्न आहे. यामध्ये बॉडीची साईज अतिशय लहान असते. आणि हँगिंग मॅन मध्ये कॅण्डलच्या खालच्या बाजूला बॉडीच्या तुलनेत दोन पट किंवा त्यापेक्षा जास्त आकाराची विक दिसून येते. 

कॅन्डल मध्ये बॉडीचा कलर हा महत्त्वाचा नसतो . म्हणजेच बॉडी चा कलर लाल किंवा हिरवा असू शकतो. 

हँगिंग मॅन पॅटर्न  हा अपट्रेंडच्या रझिस्टन्स झोन मध्ये दिसून येतो. हा बेरिश ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न म्हणून ओळखला जातो. म्हणजेच जेव्हा रझिस्टन्स  झोनमध्ये हँगिंग मॅन पॅटर्न तयार होतो तेव्हा अपट्रेंड संपुष्टात आला आहे असे संकेत मिळतात. आणि पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये घट होत असताना दिसून येते.

म्हणजे शेअरच्या किमती पुढील काळात कमी होण्याचे संकेत मिळतात याचाच अर्थ हा अपट्रेन्डला डाउनट्रेंड मध्ये घेऊन जाणारा कॅण्डलिस्टिक पॅटर्न आहे.

 हँगिंग मॅन पॅटर्न मध्ये कॅन्डलच्या वरच्या बाजूला वीक नसते किंवा असल्यास अतिशय कमी आकाराची विक दिसून येते.



महत्वाचे :

१) रझिस्टन्स झोनमध्ये कॅण्डलच्या खालच्या बाजूला तयार होणारी वीक विक्रेत्यांचे अस्तित्व ( Sellers Activation ) दाखवते.

 २) सर्वच हँगिंग मॅन पॅटर्न ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न नसतात , रझिस्टन्स झोनमध्ये तयार होणारे हँगिंग मॅन पॅटर्न हे ट्रेंड रिवर्सल ( Trend Reversal ) पॅटर्न असतात.

३) अपट्रेन्डच्या  पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होणारे हँगिंग मॅन पॅटर्न हे शक्यतो ट्रेंड कंटिन्यूएशन ( Trend Continuation ) पॅटर्न म्हणून दिसून येतात.



४) डाऊन ट्रेंडच्या पार्टिसिपेशन फेजमध्ये तयार होणारे हँगिंग मॅन पॅटर्न हे शक्यतो केवळ पुलबॅक ( Short Term Pullback ) चे संकेत असतात.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home