थ्री वीक रिजेक्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी
थ्री वीक रिजेक्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी :
अगोदर आपण या स्ट्रॅटेजी मागील मानसशास्त्र समजून घेऊ ,
१) कॅण्डल मध्ये तयार होणारी अप्पर वीक ( वरच्या बाजूला येणारी वीक ) खरेदीदारांचे बाजारावरील नियंत्रण कमी होत असल्याचे संकेत देते.
२) कॅण्डल मध्ये तयार होणारी लोअर वीक ( खालच्या बाजूला येणारी वीक ) विक्रेत्यांचे
बाजारावरील नियंत्रण कमी होत असल्याचे संकेत देते.
म्हणजेच,
Upper Wick = Rejection to Buyers
Lower Wick = Rejection to Sellers
१) एखादा स्टॉक जेव्हा अपट्रेन्ड मध्ये असतो तेव्हा जर सलग तीन कॅण्डल ला वरच्या बाजूला वीक येत असेल तर त्यामधून असे दिसून येते कि खरेदीदारांचे बाजारावरील नियंत्रण कमी-कमी होत आहे, म्हणजेच मागणीपेक्षा पुरवठा वाढत असल्याचे दिसून येते. परिणामी पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येते.
खालील चार्ट पहा .
२) एखादा स्टॉक जेव्हा डाउनट्रेन्ड मध्ये असतो, अशा वेळी येणाऱ्या पुलबॅक झोन मध्ये जर सलग तीन कॅण्डल ला वरच्या बाजूला वीक येत असेल तर त्यामधून असे दिसून येते कि खरेदीदारांचे बाजारावरील नियंत्रण कमी-कमी होत आहे, म्हणजेच मागणीपेक्षा पुरवठा वाढत असल्याचे दिसून येते. परिणामी पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येते.
खालील चार्ट पहा .
4) एखादा स्टॉक जेव्हा डाउनट्रेन्ड मध्ये असतो तेव्हा जर सलग तीन कॅण्डल ला खालच्या बाजूला वीक येत असेल तर त्यामधून असे दिसून येते कि विक्रेत्यांचे बाजारावरील नियंत्रण कमी-कमी होत आहे, म्हणजेच पुरवठ्यापेक्षा मागणी वाढत असल्याचे दिसून येते. परिणामी पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येते.
खालील चार्ट पहा .
5) एखादा स्टॉक जेव्हा अपट्रेन्ड मध्ये असतो, अशा वेळी येणाऱ्या पुलबॅक झोन मध्ये जर सलग तीन कॅण्डल ला खालच्या बाजूला वीक येत असेल तर त्यामधून असे दिसून येते कि विक्रेत्यांचे बाजारावरील नियंत्रण कमी-कमी होत आहे, म्हणजेचपुरवठ्यापेक्षा मागणी वाढत असल्याचे दिसून येते. परिणामी पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येते.
खालील चार्ट पहा .
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home