अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत: ( Signs of Weakness in Uptrend )
अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत: ( Signs of Weakness in Uptrend )
एखाद्या अपट्रेन्ड मधील स्टॉक च्या किंमती पुढे वाढत जाणार आहेत कि त्यामध्ये रिव्हर्सल येणार आहे हे समजण्यासाठी त्या ट्रेंड मधील स्ट्रेन्ग्थ आणि विकनेस ओळखता येणे आवश्यक आहे. अशा प्रकारची स्ट्रेन्थ किंवा विकनेस ओळखण्यासाठी आपल्याला काही संकेत माहित असणे आवश्यक आहे . या लेखामध्ये आपण अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत ( Signs of Weakness in Uptrend ) याबद्दल जाणून घेणार आहोत.
अशा प्रकारची स्ट्रेन्थ किंवा विकनेस ओळखण्यासाठी कॅन्डलिस्टिक आणि व्हॉल्युम यांचा उपयोग होतो.
अशा प्रकारची स्ट्रेन्थ ( Strength ) किंवा विकनेस ( Weakness ) ओळखण्यासाठी कॅन्डलिस्टिक आणि व्हॉल्युम यांचा उपयोग होतो. कॅण्डल दोन भागांनी मिळून तयार होते.
१) बॉडी
२) विक
या दोन्ही भागांच्या बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपण आपल्या इतर लेखांमध्ये त्याविषयी माहिती दिलेली आहे. हा लेख वाचत असताना इतर लेख आपण जरूर अभ्यासा .
अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत खालीलप्रमाणे ...
१) सिरीज ऑफ हायर हाय ( Higher High ) आणि हायर लो ( Higher Low ) ही रचना ब्रेक होते.
२) शेअरच्या किमती
अपट्रेन्ड मध्ये जस-जशा रजिस्टन्स झोन जवळ पोहोचतात तस-तशी कॅण्डलच्या वरच्या
बाजूला वीक येण्यास सुरुवात होते. आणि अशा वीक ची साईज वाढत असताना पाहायला मिळते
म्हणजे रजिस्टन्स झोन जवळ शेअरच्या किमती जात असताना शूटिंग स्टार किंवा डोजी
पॅटर्न तयार होत असताना पाहायला मिळतात.
३) अपट्रेन्ड मध्ये शेअरच्या किमती जसजशा रजिस्टन्स झोन जवळ पोहोचतात तसतसे ओव्हरलॅपिंग पाहायला मिळते म्हणजेच कॅण्डल मध्ये कॅन्डल तयार होताना दिसून येतात. यावरून असे दिसून येते की खरेदीदारांना आता शेअरच्या किमती नवीन उच्च किमतींना घेऊन जाणे शक्य होत नाही म्हणजेच पुरवठा आणि मागणी यांचा समतोल दिसून येतो.
४) शेअरच्या किमती जसजशा रजिस्टन्स झोन जवळ जात असतात तेव्हा ग्रीन हिरव्या कलरच्या कॅन्डलच्या बॉडीची साईज कमी कमी होत जाते. अपट्रेंडमध्ये हिरव्या कलरच्या बॉडीची साईज वरून खरेदीचा दबाव किती आहे हे समजून येते परंतु जर हिरव्या कलरच्या बॉडीची साईज कमी कमी होत जात असेल तर त्यावरून असे दिसून येते की खरेदीचा दबाव कमी कमी होत आहे परिणामी यावरून त्या अपट्रेन्ड मध्ये कमतरता विकनेस दिसून येते.
५) अपट्रेन्ड मध्ये येणारे पूलबॅक हे त्या ट्रेंड मधील अगोदरच्या ब्रेक आऊट पॉईंटला म्हणजेच सपोर्टला स्पर्श करत असताना किंवा तो सपोर्ट ब्रेक करत असताना दिसून येतात.
७) अपट्रेंडमध्ये शेअरच्या किमती वाढत असताना सुद्धा ग्रीन कलरच्या कॅण्डलच्या तुलनेत रेड कलरच्या कॅन्डल ची संख्या वाढत असताना दिसून येते.
८) अपट्रेन्डमधील
कमजोरी शोधण्यासाठी आपण वोल्युम या भागाचा सुद्धा अभ्यास करत असतो. याविषयी पुढील भागात आपण सविस्तर माहिती घेणार
आहोत.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home