टेकनिकल अनॅलिसिस म्हणजे काय ?
टेकनिकल अनॅलिसिस म्हणजे काय :
स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. शेअर मार्केट हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठीचा योग्य पर्याय नक्कीच आहे परंतु त्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य ज्ञान आवश्यक आहे.
शेअर मार्केट चा अभ्यास करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत
१) फंडामेंटल अनॅलिसिस
२) टेकनिकल अनॅलिसिस
या लेखामध्ये आपण टेकनिकल अनॅलिसिस या बद्दल जाणून घेणार आहोत.
टेकनिकल अनॅलिसिस म्हणजेच स्टॉक च्या चार्ट चा अभ्यास होय. टेकनिकल अनॅलिसिस एक प्रमुख गृहितकावर आधारित आहे ते म्हणजे " इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. "
म्हणजेच जेव्हा आपण चार्ट चा अभ्यास करतो तेव्हा चार्ट मधील मागील गोष्टींचा अभ्यास करून त्यावरून आपण उद्या किंवा भविष्यात होणाऱ्या घडामोडींबद्दल अंदाज बांधत असतो. यासाठी टेकनिकल अनॅलिसिस मध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे चार्ट चा अभ्यास होय.
आपल्याला चार्ट चे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये लाईन चार्ट, बार चार्ट , कॅन्डलिस्टिक चार्ट आणि इतर.
यापैकी सध्या कॅन्डलिस्टिक चार्टचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे कॅन्डलिस्टिक चार्ट समजायला सर्वात सोपे असतात.
टेकनिकल अनॅलिसिस मध्ये कोणत्या प्रमुख गोष्टींचा समावेश होतो याबद्दल आता आपण जाणून घेऊ.
1) Price Action Analysis
2) Volume Spread Analysis
3) Support and Resistance
4 ) Supply and Demand
5) Signs of Strength and Weakness in Uptrend
6) Signs of Strength and Weakness in Downtrend
8) Phases of market ( Accumulation , Distribution, Mark-up phase, Markdown-phase )
9) Chart pattern Analysis
10) Advance use of Indicators
11) Target, Stop loss, Entry point
12) Option Chain Analysis
13) Risk management
या वरील सर्व गोष्टींविषयी आपल्याला संपूर्ण आणि योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आपण याठिकाणी विविध लेखांच्या माध्यमातून वरील सर्व बाबींविषयी सर्व माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपले इतर लेख आवश्य वाचा आणि आपल्या इतर मराठी बांधवांपर्यंत हि माहिती जरूर पोहोचवा.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home