Friday, April 28, 2023

डार्क क्लाउड कव्हर ( Dark Cloud Cover )

 डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न : ( Dark Cloud Cover ) 



डार्क क्लाउड कव्हर पॅटर्नध्ये दोन कॅन्डलिस्टीक असतात, जे बाजारामध्ये संभाव्य मंदीचे संकेत देतात. 

डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न हा अपट्रेंडच्या रझिस्टन्स झोन मध्ये तयार होणारा बेरिश ट्रेंड रिव्हर्सल कॅंडलस्टिक पॅटर्न आहे .

ज्यामध्ये पहिली कॅण्डल मोठी हिरवी (बुलिश) कॅण्डल असते तर दुसरी कॅण्डल त्यानंतर लाल (मंदीची) कॅण्डल असते. जी आधीच्या हिरव्या कॅन्डलच्या बंद किमती पेक्षा वरच्या किमतींना ओपन होते म्हणजेच गॅप अप ओपनिंग होते परंतु, यानंतर विक्रेते शेअरच्या किंमती पहिल्या बुलिश कॅण्डलच्या बॉडीच्या ५०% च्या खाली बंद करतात.  

      यावरून असे दिसून येते कि विक्रेत्यांचे बाजारावरील नियंत्रण वाढत आहे , परिणामी पुढील काळात शेअरच्या किंमती कमी होण्याचे संकेत मिळतात. जेव्हा शेअरच्या किमती या पहिल्या हिरव्या कॅण्डलच्या निम्न ( Low price ) किमतींच्या खाली जाण्यास सुरुवात करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने मंदीचे मजबूत संकेत मिळतात.

खालील चार्ट पहा 



डार्क क्लाउड कव्हर पॅटर्नचा वापर इतर इंडिकेटर ( indicator) सोबत करणे आवश्यक आहे. शक्यतो डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न सोबत RSI या इंडिकेटर चा वापर जास्त फायद्याचा ठरतो. जेव्हा चार्ट वर डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न तयार होतो अशा वेळी जर RSI इंडिकेटर ओव्हरबॉट असेल तर तेव्हा रिव्हर्सल चे संकेत मोठ्या प्रमाणात मिळतात. 

खालील चार्ट पहा 




Tuesday, April 25, 2023

रायझिंग वेज ( Rising Wedge )

 रायझिंग वेज ( Rising Wedge ) 

रायझिंग वेज हा एक मंदी चे संकेत देणारा ( bearish pattern ) पॅटर्न आहे.

         अपट्रेंड मध्ये जेव्हा रायझिंग वेज पॅटर्न तयार होतो तेव्हा तो खालच्या बाजूला रुंद असतो आणि जसजशा किमती वाढतात तसतशी ट्रेडिंग रेंज कमी-कमी होत असताना दिसून येते त्यामुळे पॅटर्न अरुंद होत जातो. अपट्रेंड मध्ये रायझिंग वेज पॅटर्न हा ट्रेंड रिव्हर्सल ( Trend Reversal ) पॅटर्न म्हणून दिसून येतो. म्हणजेच पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये घसरण दिसून येते. 


डाउनट्रेंड मध्ये जेव्हा रायझिंग वेज पॅटर्न तयार होतो तेव्हा तो खालच्या बाजूला रुंद असतो आणि जसजशा किमती वाढतात तसतशी ट्रेडिंग रेंज कमी-कमी होत असताना दिसून येते त्यामुळे पॅटर्न अरुंद होत जातो.  डाउनट्रेंड मध्ये रायझिंग वेज पॅटर्न हा ट्रेंड कंटिनूएशन ( Trend Continuation ) पॅटर्न म्हणून दिसून येतो. म्हणजेच पुढील काळात शेअरच्या किमतींमध्ये घसरण दिसून येते. 


यावरून असे दिसून येते कि रायझिंग वेज हा बेरिश ( शेअरच्या किमतींना खाली घेऊन जाणारा ) चार्ट पॅटर्न आहे. 

रायझिंग वेज पॅटर्न मध्ये अप्पर रझिस्टन्स लाइन ( upper resistance line )  आणि  लोअर सपोर्ट लाईन ( lower support line ) दिसून येतात. 

            अप्पर रझिस्टन्स लाइन ( upper resistance line ) आणि लोअर सपोर्ट लाईन ( lower support line ) तयार होण्यासाठी किमान तीन हायर हाय ( higher high ) आणि लोअर हाय ( lower high ) किंमत बिंदू ( price point ) असावेत. पॅटर्न जसजसा पूर्णत्वाकडे जातो तसतशी रझिस्टन्स लाइन चा स्लोप कमी होताना दिसतो ( कारण खरेदीदारांचा कमी होणारा उत्साह ) म्हणजेच शेअरची किंमत वाढण्याची गती कमी ( loss of upside momentum ) होते. आणि त्यामुळे रझिस्टन्स लाइन आणि सपोर्ट लाईन एकमेकांजवळ येताना दिसून येतात.परिणामी आपल्याला त्या अपट्रेन्ड मध्ये कमजोरीचे ( signs of weakness ) संकेत मिळतात.

      रायझिंग वेज पॅटर्न मध्ये व्हॉल्यूम खूप महत्वाची भूमिका पार पडते. रायझिंग वेज पॅटर्न जसजसा पूर्णत्वाकडे जातो तसतसे व्हॉल्यूम कमी-कमी होत असताना दिसून येते. जेव्हा पॅटर्न खालच्या बाजूला ब्रेक होतो तेव्हा व्हॉल्यूम मध्ये अचानक वाढ होते.

रायझिंग वेज पॅटर्न चा वापर करताना RSI इंडिकेटर चा वापर करणे अतिशय फायद्याचे ठरते. रायझिंग वेज पॅटर्न आणि RSI  वर तयार होणार डायव्हर्जन्स यांचा वापर करून योग्य प्रकारे चार्ट चे अनालिसिस करता येते.

म्हणजेच खालील चार्ट मध्ये पहिले असता असे दिसून येते कि रायझिंग वेज पॅटर्न मध्ये तीन हायर हाय पॉईंट  ( A - B -C ) तयार होताना दिसतात तर RSI वर तयार होणार तिसरा पॉईंट ( C ) हा  पहिला हाय पॉईंट (A ) च्या खाली तयार होत असतो. यालाच RSI Hidden Divergence असे म्हणतात. जेव्हा चार्ट वर अशा प्रकारची रचना तयार होते तेव्हा शेअरच्या किमतींमध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येते. 



Sunday, April 23, 2023

बेरिश एन्गलफिंग पॅटर्न ( Bearish Engulfing )

 बेरिश एन्गलफिंग पॅटर्न ( Bearish Engulfing ) : 


बेरिश एन्गलफिंग पॅटर्न हा दोन कॅन्डलिस्टीक ने मिळून तयार होणारा बेरिश ट्रेंड रिव्हर्सल ( Bearish Trend Reversal ) पॅटर्न आहे , जे बाजारामध्ये संभाव्य मंदीचे संकेत देतात.

बेरिश एन्गलफिंग पॅटर्न हा अपट्रेंडच्या शीर्षस्थानी म्हणजेच रझिस्टन्स झोन मध्ये तयार होणारा बेरिश ट्रेंड रिव्हर्सल कॅंडलस्टिक पॅटर्न आहे .

ज्यामध्ये पहिली कॅण्डल हिरवी (तेजीची) कॅण्डल असते तर दुसरी कॅण्डल लाल (मंदीची) कॅण्डल असते. ज्यामध्ये लाल (मंदीची) कॅण्डलचा मुख्य भाग म्हणजेच बॉडी आदल्या दिवशीच्या हिरवी (तेजीची) कॅन्डलच्या  मुख्य भागाला म्हणजेच बॉडीला  पूर्णपणे  झाकून टाकते म्हणजेच ओव्हरलॅप करते  किंवा व्यापते .

      यावरून असे दिसून येते कि विक्रेत्यांची बाजारावरील पकड मजबूत होत आहे , परिणामी पुढील काळात शेअरच्या किंमती कमी होण्याचे संकेत मिळतात.

खालील चार्ट पहा : 


महत्वाचे : 
    बेरिश एन्गलफिंग (Bearish Engulfing ) पॅटर्न चा वापर करताना नेहमी RSI इंडीकेटर चा वापर फायद्याचा ठरतो. म्हणजेच जेव्हा आपण भरपूर चार्ट चा अभ्यास करतो तेव्हा असे दिसून येते कि जेव्हा बेरिश एन्गलफिंग (Bearish Engulfing ) पॅटर्न चार्ट मध्ये दिसून येतो तेव्हा जर RSI इंडीकेटर ओव्हरबॉट असेल ( म्हणजेच RSI ७० लेव्हल च्या जवळ असेल ) तर अशा वेळी पुढील काळात आपल्याला किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. 

खालील चार्ट पहा 



बुलिश एन्गलफिंग पॅटर्न ( Bullish Engulfing )

 बुलिश एन्गलफिंग पॅटर्न ( Bullish Engulfing ) : 



बुलिश एन्गलफिंग ( Bullish Engulfing ) पॅटर्न हा दोन कॅन्डलिस्टीक ने मिळून तयार होणारा बुलिश ट्रेंड रिव्हर्सल ( Bullish Trend Reversal ) पॅटर्न आहे , जे बाजारामध्ये संभाव्य तेजीचे संकेत देतात.

बुलिश एन्गलफिंग पॅटर्न हा डाउनट्रेंडच्या तळाशी म्हणजेच सपोर्ट झोन ( Support Zone ) मध्ये तयार होणारा बुलिश ट्रेंड रिव्हर्सल कॅंडलस्टिक पॅटर्न आहे .

ज्यामध्ये पहिली कॅण्डल लाल (मंदीची) असते तर दुसरी कॅण्डल त्यानंतर हिरवी (तेजीची ) कॅण्डल असते. ज्यामध्ये हिरवी (तेजीची ) कॅण्डलचा मुख्य भाग म्हणजेच बॉडी आदल्या दिवशीच्या लाल (मंदीची) कॅन्डलच्या  मुख्य भागाला म्हणजेच बॉडीला  पूर्णपणे  झाकून टाकते म्हणजेच ओव्हरलॅप ( Overlapping ) करते किंवा व्यापते .

               यावरून असे दिसून येते कि खरेदीदारांची बाजारावरील पकड मजबूत होत आहे , परिणामी पुढील काळात शेअरच्या किंमती वाढण्याचे संकेत मिळतात.

खालील चार्ट पहा 


महत्वाचे : 
    बुलिश एन्गलफिंग ( Bullish Engulfing ) पॅटर्न चा वापर करताना नेहमी RSI इंडीकेटर चा वापर फायद्याचा ठरतो. म्हणजेच जेव्हा आपण भरपूर चार्ट चा अभ्यास करतो तेव्हा असे दिसून येते कि जेव्हा बुलिश एन्गलफिंग ( Bullish Engulfing ) पॅटर्न चार्ट मध्ये दिसून येतो तेव्हा जर RSI इंडीकेटर ओव्हरसोल्ड ( Oversold ) असेल ( म्हणजेच RSI ३० लेव्हल च्या जवळ असेल ) तर अशा वेळी पुढील काळात आपल्याला किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. 

खालील चार्ट पहा 




Saturday, April 22, 2023

RSI सिंगल बेरिश डायव्हर्जन्स ( RSI Bearish Divergence )

 RSI सिंगल बेरिश डायव्हर्जन्स : 

रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे.  रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) चा  वापर करून आपण  शेअरच्या किमतीच्या हालचालींचा वेग आणि त्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करतो. आरएसआय आणि १०० च्या दरम्यान वर-खाली फिरत असतो .

जेव्हा आरएसआय 70 च्या वर जातो ( ओव्हरबॉट )  तेव्हा शेअर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली असल्याचे मानले जाते.  आणि 30 च्या खाली गेल्यावर ( ओव्हरसोल्ड ) शेअरमध्ये खूप जास्त प्रमाणात विक्री झाल्याचे मानले जाते.

             RSI चा वापर शेअरच्या किमतींमधील ट्रेंड ओळखण्यासाठी देखील केला जातो.

महत्वाचे : जेव्हा स्टॉक मजबूत ट्रेंड मध्ये असतो तेव्हा , RSI जास्त काळासाठी ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोन मध्ये राहू शकतो.

 RSI इंडिकेटर चा वापर विविध प्रकारे केला जातो त्यामध्ये,

) RSI ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड

) RSI Range ठरवणे

) RSI Range Shift म्हणजे काय?

) RSI चा सपोर्ट आणि रझिस्टन्स म्हणून वापर

) RSI चा वापर करून ब्रेकआऊट आणि ब्रेकडाऊन शोधणे

) RSI सिंगल बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स

) RSI डबल बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स

) RSI Hidden  बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स

RSI हा शेअरच्या किमतींसोबत चालणार इंडिकेटर आहे. परंतु कधीकधी RSI  इंडिकेटर आणि शेअरच्या किमतीच्या हालचालींमध्ये विसंगती दिसून येते. अशा प्रकारची विसंगती म्हणजेच डायव्हर्जन्स होय.

 

RSI मध्ये दोन प्रकारचे डायव्हर्जन्स दिसून येतात

A) सकारात्मक ( positive ) डायव्हर्जन्स

B) नकारात्मक ( Negative ) डायव्हर्जन्स

              या लेखामध्ये आपण RSI च्या RSI सिंगल  बेरिश डायव्हर्जन्स ( RSI Bearish Divergence)  बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

A) नकारात्मक ( Negative ) डायव्हर्जन्स ( RSI Bearish Divergence )जेव्हा शेअरच्या किमती या अपट्रेंड मध्ये असतात तेव्हा रझिस्टन्स झोन जवळ अशा प्रकारचा नकारात्मक ( Negative ) डायव्हर्जन्स दिसून येतो

     अशा वेळी चार्ट मध्ये शेअरच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसून येते परंतु  RSI मध्ये घट होत असताना पाहायला मिळते. म्हणजेच किमतींवर हायर हाय तयार होतो परंतु RSI वर लोअर हाय तयार होतो

      जेव्हा अशा प्रकारची रचना आपल्याला दिसून येते तेव्हा पुढील काळात शेअरच्या किंमती कमी होण्याचे ( Trend Reversal ) संकेत मिळतात.

1) खालील रचनेमध्ये किमतींवर हायर हाय अशा प्रकारची रचना दिसून येते परंतु RSI वर लोअर हाय  अशा प्रकारची रचना दिसून येते. अशा वेळी शेअरच्या किमती पुढील काळात कमी होण्याचे मजबूत संकेत मिळतात. 

 



खालील चार्ट पहा 


२) खालील रचनेमध्ये किमती समान पातळीवर राहतात म्हणजेच डबल टॉप प्रकारची प्रकारची रचना दिसून येते परंतु RSI वर लोअर हाय  अशा प्रकारची रचना दिसून येते. अशा वेळी शेअरच्या किमती पुढील काळात कमी होण्याचे मजबूत संकेत मिळतात. 




खालील चार्ट पहा 


३) खालील रचनेमध्ये किमतीवर हायर हाय अशा प्रकारची रचना दिसून येते परंतु RSI समान पातळीवर म्हणजेच RSI वर डबल टॉप अशा प्रकारची रचना दिसून येते. अशा वेळी शेअरच्या किमती पुढील काळात कमी होण्याचे मजबूत संकेत मिळतात. 




खालील चार्ट पहा 



अशा प्रकारे आपण  RSI सिंगल बेरिश डायव्हर्जन्स चा वापर करून शेअरच्या किमतींबाबत योग्य अंदाज लावू शकतो. 


Friday, April 21, 2023

RSI सिंगल बुलिश डायव्हर्जन्स ( RSI Bullish Divergence )

  RSI सिंगल बुलिश डायव्हर्जन्स: 

रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे.  रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) चा  वापर करून आपण  शेअरच्या किमतीच्या हालचालींचा वेग आणि त्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करतो. आरएसआय आणि १०० च्या दरम्यान वर-खाली फिरत असतो .

जेव्हा आरएसआय 70 च्या वर जातो ( ओव्हरबॉट )  तेव्हा शेअर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली असल्याचे मानले जाते.  आणि 30 च्या खाली गेल्यावर ( ओव्हरसोल्ड ) शेअरमध्ये खूप जास्त प्रमाणात विक्री झाल्याचे मानले जाते.

             RSI चा वापर शेअरच्या किमतींमधील ट्रेंड ओळखण्यासाठी देखील केला जातो.

महत्वाचे : जेव्हा स्टॉक मजबूत ट्रेंड मध्ये असतो तेव्हा , RSI जास्त काळासाठी ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोन मध्ये राहू शकतो.

 RSI इंडिकेटर चा वापर विविध प्रकारे केला जातो त्यामध्ये,

) RSI ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड

) RSI Range ठरवणे

) RSI Range Shift म्हणजे काय?

) RSI चा सपोर्ट आणि रझिस्टन्स म्हणून वापर

) RSI चा वापर करून ब्रेकआऊट आणि ब्रेकडाऊन शोधणे

) RSI सिंगल बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स

) RSI डबल बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स

) RSI Hidden  बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स

या लेखामध्ये आपण RSI च्या RSI सिंगल बुलिश / बेरिश डायव्हर्जन्स बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

RSI हा शेअरच्या किमतींसोबत चालणार इंडिकेटर आहे. परंतु कधीकधी RSI  इंडिकेटर आणि शेअरच्या किमतीच्या हालचालींमध्ये विसंगती दिसून येते. अशा प्रकारची विसंगती म्हणजेच डायव्हर्जन्स होय.

 

RSI मध्ये दोन प्रकारचे डायव्हर्जन्स दिसून येतात

A) सकारात्मक ( positive ) डायव्हर्जन्स

B) नकारात्मक ( Negative ) डायव्हर्जन्स

 

A) सकारात्मक ( positive ) डायव्हर्जन्स :

      जेव्हा शेअरच्या किमती या डाउनट्रेंड मध्ये असतात तेव्हा सपोर्ट झोन जवळ अशा प्रकारचा सकारात्मक ( positive ) डायव्हर्जन्स  दिसून येतो.

     अशा वेळी चार्ट मध्ये शेअरच्या किमतींमध्ये घट होताना दिसून येते परंतु  RSI मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. म्हणजेच किमतींवर लोअर लो तयार होतो परंतु RSI वर हायर लो तयार होतो. 

      जेव्हा अशा प्रकारची रचना आपल्याला दिसून येते तेव्हा पुढील काळात शेअरच्या किंमती वाढण्याचे ( Trend Reversal ) संकेत मिळतात.

1) खालील रचनेमध्ये किमतींवर लोअर लो अशा प्रकारची रचना दिसून येते परंतु RSI वर हायर लो अशा प्रकारची रचना दिसून येते. अशा वेळी शेअरच्या किमती पुढील काळात वाढण्याचे मजबूत संकेत मिळतात. 




खालील चार्ट पहा 



 2) खालील रचनेमध्ये किमतींवर सामान पातळीवर लो ( डबल बॉटम ) अशा प्रकारची रचना दिसून येते परंतु RSI वर हायर लो अशा प्रकारची रचना दिसून येते. अशा वेळी शेअरच्या किमती पुढील काळात वाढण्याचे मजबूत संकेत मिळतात. 



 खालील चार्ट पहा  


3) खालील रचनेमध्ये किमतींवर सामान पातळीवर लोअर लो अशा प्रकारची रचना दिसून येते परंतु RSI सामान पातळीवर आहे अशा प्रकारची रचना दिसून येते. अशा वेळी शेअरच्या किमती पुढील काळात वाढण्याचे मजबूत संकेत मिळतात. 



खालील चार्ट पहा  


अशा प्रकारे आपण  RSI सिंगल बुलिश डायव्हर्जन्स चा वापर करून शेअरच्या किमतींबाबत योग्य अंदाज लावू शकतो.



दुहेरी टॉप पॅटर्न : ( Double Top Pattern )

 

दुहेरी टॉप पॅटर्न : ( Double Top Pattern )



दुहेरी टॉप पॅटर्नमध्ये चार्ट मध्ये सामान किंमत पातळीवर दोन उच्च बिंदू ( same high point ) तयार होतात.

 दुहेरी टॉप पॅटर्न हा बेरिश ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न ( Bearish trend Reversal Pattern ) आहे . म्हणजेच अशा प्रकारचा पॅटर्न तयार झाल्यानंतर शेअरच्या किमतींमध्ये पुढील काळात घसरण होण्याचे संकेत मिळतात.

जेव्हा शेअरच्या किमती या दुसऱ्या टॉप च्या दिशेने वर जात असतात तेव्हा त्या अपट्रेन्ड मध्ये कमजोरीचे संकेत दिसून येतात. व त्यावरून बाजारातील खरेदीदारांची ताकद कमी होत आहे असे दिसून येते.

दुहेरी टॉप पॅटर्न तयार होत असताना लक्षात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे :

दुहेरी टॉप पॅटर्न हा एका मोठ्या अपट्रेंड नंतर तयार होणारा चार्ट पॅटर्न आहे.  दुहेरी टॉप पॅटर्न मध्ये तयार होणारा पहिला उच्च बिंदू ( first top ) हा चालू अपट्रेंड चा भाग असतो. पहिल्या उच्च बिंदूपासून किमतींमध्ये घसरण दिसून येते ही घसरण सामान्यतः 15 ते 20 टक्क्यांपर्यंत पाहायला मिळते. या घसरणीमध्ये विक्रेत्यांचा दबाव ( selling pressure ) दिसून येतो.

          त्यानंतर किमती एका पातळीवर सपोर्ट घेतात आणि पुन्हा किमतीमधील वाढ दिसून येते आणि किमती पुन्हा पहिल्या उच्च बिंदूच्या ( first top ) दिशेने जातात. म्हणजेच यावेळी दुसऱ्या टॉपची निर्मिती चालू असते.

           परंतु दुसरा टॉप ( second top ) तयार होत असताना येणाऱ्या अपट्रेंड मध्ये शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना त्यामध्ये खरेदीदारांचा उत्साह ( low buying pressure ) दिसून येत नाही. अशावेळी जेव्हा किमती पहिल्या टॉपच्या पातळीवर पोहोचतात तेव्हा पुन्हा शेअरच्या किंमतीमध्ये घट होण्यास सुरुवात होते. आणि त्या ठिकाणी दुसरा उच्च बिंदू ( second top ) तयार होत असताना दिसून येतो.

         दुसऱ्या उच्च बिंदूपासून शेअरच्या किमतीमध्ये घट होण्यास सुरुवात होते आणि या घटीमध्ये विक्रेत्यांचा अति उत्साह ( high selling pressure ) दिसून येतो. म्हणजेच मोठ्या प्रमाणात वोल्युम ( very high volume ) दिसून येते. जेव्हा किमती या पहिल्या सपोर्ट झोन जवळ जातात आणि त्या सपोर्ट झोनला ब्रेक करून खालच्या बाजूला घसरतात तेव्हा डबल टॉप पॅटर्न पूर्ण झाला आहे असे दिसून येते.

 

 बाजारामध्ये दुसरा टॉप तयार होत असताना येणाऱ्या ट्रेंडमध्ये खालीलपैकी काही कमजोरीचे संकेत ( Sign of Weakness ) दिसून येतात.

१) जसजशा किमती पहिल्या टॉपच्या जवळ जाऊ लागतात तसतसे ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या बॉडीची साईज कमी होत असताना दिसून येते.

२) त्या अपट्रेन्डमध्ये तयार होणाऱ्या कॅन्डलच्या वरच्या बाजूला वीक ( upper wick ) येण्यास सुरुवात होते आणि अशा विकची साईज वाढत असताना दिसून येते.

३) ग्रीन कॅण्डलच्या तुलनेत रेड कॅण्डल चा आकार जास्त असल्याचे दिसून येते.

४) शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सुद्धा ग्रीन कॅण्डल च्या संख्येपेक्षा लाल कॅण्डल ची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

५) डोजी कॅण्डलिस्टिक तयार होण्यास सुरुवात होते.

६) चार्टमध्ये ओरलॅपिंग म्हणजेच कॅण्डल मध्ये कॅन्डल येण्यास सुरुवात होते.

७) RSI सारख्या इंडिकेटर मध्ये बेरिश डायव्हरजन्स ( Bearish Divergence ) दिसून येतो

८) RSI इंडिकेटर वर किमती ओव्हरबॉट ( Overbought ) झाल्याचे दिसून येते.

९) दुहेरी टॉप पॅटर्न मधील दुसरा टॉप तयार होत असताना येणाऱ्या अपट्रेन्ड मध्ये काही वेळा खरेदीदारांचा अति उत्साह दिसून येतो म्हणजेच या अपट्रेन्ड मध्ये खूप मोठ्या आकाराच्या ग्रीन कॅण्डल तयार होत असताना दिसून येतात.  यालाच टेकनिकल एनालिसिस मध्ये बाईंग क्लायमॅक्स ( Buying Climax ) म्हटले जाते अशा प्रकारचा बाईंग क्लाइमॅक्स ( Buying Climax ) हा ट्रेंड रिवर्स ( sign of trend Reversal ) होण्याचा महत्त्वाचा संकेत आहे.

१०) दुहेरी टॉप पॅटर्न मधील दुसरा टॉप तयार होत असताना येणाऱ्या अपट्रेन्ड मध्ये शेअरच्या किमतींमध्ये वाढ होत असते मात्र , वोल्युम चा अभ्यास केला असता असे दिसून येते कि वोल्युम कमी-कमी होत आहे. यालाच प्राईज-वोल्युम डायव्हर्जन्स ( price-volume Divergence ) असे म्हणतात. व हा एक कमजोरीचा संकेत ( sign of weakness ) आहे. 


Thursday, April 20, 2023

टेकनिकल अनॅलिसिस म्हणजे काय ?

 टेकनिकल अनॅलिसिस म्हणजे काय : 



    स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. शेअर मार्केट हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठीचा योग्य पर्याय नक्कीच आहे परंतु त्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य ज्ञान आवश्यक आहे. 

       शेअर मार्केट चा अभ्यास करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत 

१) फंडामेंटल अनॅलिसिस

२) टेकनिकल अनॅलिसिस 

       या लेखामध्ये आपण टेकनिकल अनॅलिसिस या बद्दल जाणून घेणार आहोत.

 टेकनिकल अनॅलिसिस म्हणजेच स्टॉक च्या चार्ट चा अभ्यास होय.  टेकनिकल अनॅलिसिस एक प्रमुख गृहितकावर आधारित आहे ते म्हणजे " इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. " 

            म्हणजेच जेव्हा आपण चार्ट चा अभ्यास करतो तेव्हा चार्ट मधील मागील गोष्टींचा अभ्यास करून त्यावरून आपण उद्या किंवा भविष्यात होणाऱ्या घडामोडींबद्दल अंदाज बांधत असतो. यासाठी  टेकनिकल अनॅलिसिस मध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे चार्ट चा अभ्यास होय. 

आपल्याला चार्ट चे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये लाईन चार्ट, बार चार्ट , कॅन्डलिस्टिक चार्ट आणि इतर. 

         यापैकी सध्या कॅन्डलिस्टिक चार्टचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे कॅन्डलिस्टिक चार्ट समजायला सर्वात सोपे असतात. 

 टेकनिकल अनॅलिसिस मध्ये कोणत्या प्रमुख गोष्टींचा समावेश होतो याबद्दल आता आपण जाणून घेऊ. 

1) Price Action Analysis 

2) Volume Spread Analysis 

3) Support and Resistance 

4 ) Supply and Demand 

5) Signs of Strength and Weakness in Uptrend 

6) Signs of Strength and Weakness in Downtrend

8) Phases of market ( Accumulation , Distribution, Mark-up phase, Markdown-phase ) 

9) Chart pattern Analysis 

10)  Advance use of Indicators 

11) Target, Stop loss, Entry point 

12) Option Chain Analysis 

13) Risk management 

        या वरील सर्व गोष्टींविषयी आपल्याला संपूर्ण आणि योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आपण याठिकाणी विविध लेखांच्या माध्यमातून वरील सर्व बाबींविषयी सर्व माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपले इतर लेख आवश्य वाचा आणि आपल्या इतर मराठी बांधवांपर्यंत हि माहिती जरूर पोहोचवा. 


       

अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत: ( Signs of Weakness in Uptrend )

 अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत: ( Signs of Weakness in Uptrend )

        एखाद्या अपट्रेन्ड मधील स्टॉक च्या किंमती पुढे वाढत जाणार आहेत कि त्यामध्ये रिव्हर्सल येणार आहे हे समजण्यासाठी त्या ट्रेंड मधील स्ट्रेन्ग्थ आणि विकनेस ओळखता येणे आवश्यक आहे. अशा प्रकारची स्ट्रेन्थ किंवा विकनेस ओळखण्यासाठी आपल्याला काही संकेत माहित असणे आवश्यक आहे . या लेखामध्ये आपण  अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत ( Signs of Weakness in Uptrend ) याबद्दल जाणून घेणार आहोत. 

       अशा प्रकारची स्ट्रेन्थ किंवा विकनेस ओळखण्यासाठी कॅन्डलिस्टिक आणि व्हॉल्युम यांचा उपयोग होतो. 

         अशा प्रकारची स्ट्रेन्थ ( Strength ) किंवा विकनेस ( Weakness ) ओळखण्यासाठी कॅन्डलिस्टिक आणि व्हॉल्युम यांचा उपयोग होतो. कॅण्डल दोन भागांनी मिळून तयार होते.

 १) बॉडी 

 २) विक 

     या दोन्ही भागांच्या बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपण आपल्या इतर लेखांमध्ये त्याविषयी माहिती दिलेली आहे. हा लेख वाचत असताना इतर लेख आपण जरूर अभ्यासा . 

अपट्रेन्ड मधील कमजोरी दाखवणारे संकेत खालीलप्रमाणे ...

१)     सिरीज ऑफ हायर हाय ( Higher High ) आणि हायर लो ( Higher Low ) ही रचना ब्रेक होते.


२) शेअरच्या किमती अपट्रेन्ड मध्ये जस-जशा रजिस्टन्स झोन जवळ पोहोचतात तस-तशी कॅण्डलच्या वरच्या बाजूला वीक येण्यास सुरुवात होते. आणि अशा वीक ची साईज वाढत असताना पाहायला मिळते म्हणजे रजिस्टन्स झोन जवळ शेअरच्या किमती जात असताना शूटिंग स्टार किंवा डोजी पॅटर्न तयार होत असताना पाहायला मिळतात.

३) अपट्रेन्ड मध्ये शेअरच्या किमती जसजशा रजिस्टन्स झोन जवळ पोहोचतात तसतसे ओव्हरलॅपिंग पाहायला मिळते म्हणजेच कॅण्डल मध्ये कॅन्डल तयार होताना दिसून येतात. यावरून असे दिसून येते की खरेदीदारांना आता शेअरच्या किमती नवीन उच्च किमतींना घेऊन जाणे शक्य होत नाही म्हणजेच पुरवठा आणि मागणी यांचा समतोल दिसून येतो.


४)  शेअरच्या किमती जसजशा रजिस्टन्स झोन जवळ जात असतात तेव्हा ग्रीन हिरव्या कलरच्या कॅन्डलच्या बॉडीची साईज कमी कमी होत जाते.  अपट्रेंडमध्ये हिरव्या कलरच्या बॉडीची साईज वरून खरेदीचा दबाव किती आहे हे समजून येते परंतु जर हिरव्या कलरच्या बॉडीची साईज कमी कमी होत जात असेल तर त्यावरून असे दिसून येते की खरेदीचा दबाव कमी कमी होत आहे परिणामी यावरून त्या अपट्रेन्ड मध्ये कमतरता  विकनेस दिसून येते.


५)  अपट्रेन्ड मध्ये येणारे पूलबॅक हे त्या ट्रेंड मधील अगोदरच्या ब्रेक आऊट पॉईंटला म्हणजेच सपोर्टला स्पर्श करत असताना किंवा तो सपोर्ट ब्रेक करत असताना दिसून येतात.


 ६)  जसजशा  किमती या रजिस्टन्स जवळ पोहोचतात तसतसे हिरव्या कॅण्डलची साईज कमी होत जाते व लाल कॅण्डल ची साईज वाढत असताना दिसून येते.

७)  अपट्रेंडमध्ये शेअरच्या किमती वाढत असताना सुद्धा ग्रीन कलरच्या कॅण्डलच्या तुलनेत रेड कलरच्या कॅन्डल ची संख्या वाढत असताना दिसून येते.


८) अपट्रेन्डमधील कमजोरी शोधण्यासाठी आपण वोल्युम या भागाचा सुद्धा अभ्यास करत असतो.  याविषयी पुढील भागात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. 

 

 



Wednesday, April 19, 2023

स्पिनिंग टॉप ( Spinning Top )

 स्पिनिंग टॉप ( Spinning Top ) :




स्पिनिंग टॉप हा रझिस्टन्स  झोन मध्ये तयार होणारा बेरिश ट्रेंड रिवर्सल ( Bearish Trend Reversal ) कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहे.  यामध्ये कॅण्डलच्या मध्यभागी छोट्या आकाराची बॉडी पाहायला मिळते. स्पिनिंग टॉप पॅटर्न मध्ये बॉडी ची साईज ही एकूण कॅण्डलच्या तुलनेत ५% पर्यंत असल्याचे पाहायला मिळते.

       बॉडीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला जवळपास  समान आकाराच्या लांब वीक दिसून येतात. कॅण्डल मध्ये तयार होणाऱ्या बॉडी चा कलर महत्त्वाचा नसतो म्हणजेच बॉडीचा कलर हा लाल किंवा हिरवा असू शकतो.

 स्पिनिंग टॉप या कॅण्डलिस्टिक पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला तयार होणाऱ्या मोठ्या आकाराच्या वीक मधून बाजारातील अस्थिरता ( High Volatility ) दिसून येते. ज्यावेळी रझिस्टन्स झोनमध्ये अशा प्रकारे अस्थिरता दिसून येते तेव्हा ट्रेंड रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात.


                     Spinning Top Candle = High Volatility

Important : 

High volatility at Resistance is the sign of trend reversal , when there is weakness in the background. 


उदा. १) खालील चार्ट पहा 

उदा. २) खालील चार्ट पहा 



जर अपट्रेंडच्या किंवा डाउनट्रेंडच्या पार्टीसिपेशन झोनमध्ये स्पिंनिंग टॉप / बॉटम पॅटर्न तयार होत असतील तर त्यामधून आपल्याला ट्रेंड पुढे चालू राहण्याचे संकेत मिळतात.

उदा. १) खालील चार्ट पहा 


उदा. २) खालील चार्ट पहा