दुहेरी टॉप पॅटर्न : ( Double Top Pattern )
दुहेरी टॉप पॅटर्न : ( Double Top Pattern )
दुहेरी टॉप पॅटर्नमध्ये चार्ट मध्ये सामान किंमत पातळीवर दोन उच्च बिंदू (
same high point ) तयार होतात.
दुहेरी टॉप पॅटर्न हा बेरिश ट्रेंड
रिव्हर्सल पॅटर्न ( Bearish trend Reversal Pattern ) आहे . म्हणजेच अशा प्रकारचा
पॅटर्न तयार झाल्यानंतर शेअरच्या किमतींमध्ये पुढील काळात घसरण होण्याचे संकेत
मिळतात.
जेव्हा शेअरच्या किमती या दुसऱ्या टॉप च्या दिशेने वर जात असतात तेव्हा त्या
अपट्रेन्ड मध्ये कमजोरीचे संकेत दिसून येतात. व त्यावरून बाजारातील खरेदीदारांची
ताकद कमी होत आहे असे दिसून येते.
दुहेरी टॉप पॅटर्न तयार होत असताना लक्षात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे :
दुहेरी टॉप पॅटर्न हा एका मोठ्या अपट्रेंड नंतर तयार होणारा चार्ट पॅटर्न
आहे. दुहेरी टॉप पॅटर्न मध्ये तयार होणारा
पहिला उच्च बिंदू ( first top ) हा चालू अपट्रेंड चा भाग असतो. पहिल्या उच्च
बिंदूपासून किमतींमध्ये घसरण दिसून येते ही घसरण सामान्यतः 15 ते 20
टक्क्यांपर्यंत पाहायला मिळते. या घसरणीमध्ये विक्रेत्यांचा दबाव ( selling
pressure ) दिसून येतो.
त्यानंतर किमती एका पातळीवर सपोर्ट घेतात आणि
पुन्हा किमतीमधील वाढ दिसून येते आणि किमती पुन्हा पहिल्या उच्च बिंदूच्या ( first
top ) दिशेने जातात. म्हणजेच यावेळी दुसऱ्या टॉपची निर्मिती चालू असते.
परंतु दुसरा टॉप ( second top ) तयार होत असताना
येणाऱ्या अपट्रेंड मध्ये शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना त्यामध्ये खरेदीदारांचा
उत्साह ( low buying pressure ) दिसून येत नाही. अशावेळी जेव्हा किमती पहिल्या
टॉपच्या पातळीवर पोहोचतात तेव्हा पुन्हा शेअरच्या किंमतीमध्ये घट होण्यास सुरुवात
होते. आणि त्या ठिकाणी दुसरा उच्च बिंदू ( second top ) तयार होत असताना दिसून
येतो.
दुसऱ्या उच्च बिंदूपासून शेअरच्या किमतीमध्ये घट
होण्यास सुरुवात होते आणि या घटीमध्ये विक्रेत्यांचा अति उत्साह ( high selling
pressure ) दिसून येतो. म्हणजेच मोठ्या प्रमाणात वोल्युम ( very high volume )
दिसून येते. जेव्हा किमती या पहिल्या सपोर्ट झोन जवळ जातात आणि त्या सपोर्ट झोनला
ब्रेक करून खालच्या बाजूला घसरतात तेव्हा डबल टॉप पॅटर्न पूर्ण झाला आहे असे दिसून
येते.
बाजारामध्ये दुसरा टॉप तयार होत
असताना येणाऱ्या ट्रेंडमध्ये खालीलपैकी काही कमजोरीचे संकेत ( Sign of Weakness )
दिसून येतात.
१) जसजशा किमती पहिल्या टॉपच्या जवळ जाऊ लागतात तसतसे ग्रीन कलरच्या
कॅन्डलच्या बॉडीची साईज कमी होत असताना दिसून येते.
२) त्या अपट्रेन्डमध्ये तयार होणाऱ्या कॅन्डलच्या वरच्या बाजूला वीक ( upper
wick ) येण्यास सुरुवात होते आणि अशा विकची साईज वाढत असताना दिसून येते.
३) ग्रीन कॅण्डलच्या तुलनेत रेड कॅण्डल चा आकार जास्त असल्याचे दिसून येते.
४) शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सुद्धा ग्रीन कॅण्डल च्या संख्येपेक्षा
लाल कॅण्डल ची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
५) डोजी कॅण्डलिस्टिक तयार होण्यास सुरुवात होते.
६) चार्टमध्ये ओरलॅपिंग म्हणजेच कॅण्डल मध्ये कॅन्डल येण्यास सुरुवात होते.
७) RSI सारख्या इंडिकेटर मध्ये बेरिश
डायव्हरजन्स ( Bearish Divergence ) दिसून येतो
८) RSI इंडिकेटर वर किमती ओव्हरबॉट ( Overbought
) झाल्याचे दिसून येते.
९) दुहेरी टॉप पॅटर्न मधील दुसरा टॉप तयार होत असताना येणाऱ्या अपट्रेन्ड
मध्ये काही वेळा खरेदीदारांचा अति उत्साह दिसून येतो म्हणजेच या अपट्रेन्ड मध्ये
खूप मोठ्या आकाराच्या ग्रीन कॅण्डल तयार होत असताना दिसून येतात. यालाच टेकनिकल एनालिसिस मध्ये बाईंग क्लायमॅक्स
( Buying Climax ) म्हटले जाते अशा प्रकारचा बाईंग क्लाइमॅक्स ( Buying Climax )
हा ट्रेंड रिवर्स ( sign of trend Reversal ) होण्याचा महत्त्वाचा संकेत आहे.
१०) दुहेरी टॉप पॅटर्न मधील दुसरा टॉप तयार होत असताना येणाऱ्या अपट्रेन्ड
मध्ये शेअरच्या किमतींमध्ये वाढ होत असते मात्र , वोल्युम चा अभ्यास केला असता असे दिसून येते कि वोल्युम
कमी-कमी होत आहे. यालाच प्राईज-वोल्युम डायव्हर्जन्स ( price-volume Divergence )
असे म्हणतात. व हा एक कमजोरीचा संकेत ( sign of weakness ) आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home